मुंबई सेंट्रल ते हजरत निझामुद्दीन दरम्यान धावणार्‍या August Kranti Tejas Rajdhani Express ला आता जोडले जाणार अधिकचे AC 3-Tier Coach

प्रवाशांना www.enquiry.indianrail.gov.in या अधिकृत रेल्वे चौकशी वेबसाइटला भेट देऊन तपशीलवार ट्रेन वेळापत्रक, थांबे आणि अपडेटेड कोच रचना पाहता येतील.

Photo Credit- X

सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्याने अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडत आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये रिझर्व्हेशन सध्या फुल्ल झाली आहेत. अशात प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून 12953/12954 Mumbai Central – Hazrat Nizamuddin August Kranti Tejas Rajdhani Express ला अधिकचे AC 3-Tier coach लावण्याचा निर्णय झाला आहे.

August Kranti Tejas Rajdhani Express ला हा अतिरिक्त कोच 7 मे 2025 पासून मुंबई सेंट्रलच्या सुटण्याच्या वेळी आणि 8 मे 2025 पासून हजरत निजामुद्दीनहून परतीच्या प्रवासाच्या वेळी लावले जातील. ज्यामुळे ट्रेनची क्षमता वाढेल. प्रत्येक नवीन एसी 3-टायर कोचमध्ये अंदाजे 72 प्रवासी बसू शकतात, ज्यामुळे प्रतीक्षा यादी पुढे सरकण्यास मदत होईल आणि मुंबई आणि दिल्ली दरम्यान प्रवाशांना चांगले प्रवास पर्याय उपलब्ध होतील.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक म्हणाले की, ऑगस्ट क्रांती तेजस राजधानी एक्सप्रेस तिच्या वेग, वक्तशीरपणा आणि उत्कृष्ट ऑनबोर्ड सेवांसाठी ओळखली जाते, ज्यामुळे ती मुंबई-दिल्ली मार्गावर प्रवासासाठी पसंतीची निवड बनते. प्रवाशांचा अनुभव सुधारण्यासाठी आणि वाढत्या प्रवासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या सततच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. या वाढीमुळे गर्दीच्या प्रवासाच्या काळात आवश्यक असलेला दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. Special Summer Vacation International Tours: प्रवाशांसाठी खुशखबर! मुंबई IRCTC ने जाहीर केले दुबई, श्रीलंका, नेपाळ आणि युरोपसाठी उन्हाळी विशेष टूर पॅकेजेस, जाणून घ्या सविस्तर .

प्रवाशांना www.enquiry.indianrail.gov.in या अधिकृत रेल्वे चौकशी वेबसाइटला भेट देऊन तपशीलवार ट्रेन वेळापत्रक, थांबे आणि अपडेटेड कोच रचना पाहता येतील.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement