Mulayam Singh Yadav Dies: मुलायम सिंग यादव यांचे निधन; वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंग यादव (Mulayam Singh Yadav)यांचे आज निधन झाले आहे.

Mulayam Singh Yadav | PC: Twitter/ DD

समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंग यादव (Mulayam Singh Yadav)यांचे आज निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी गुरूग्रामच्या Medanta Hospital मध्ये अखेरचा श्वास घेतला आहे. मागील काही दिवसांपासून मुलायम सिंह यांच्या प्रकृतीमध्ये चढ-उतार होत होता. त्यांना आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना लाईफ सेव्हिंग ड्रग्स वर ठेवण्यात आले होते. युरीन इंफेक्शनचा त्रास होत असल्याने त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते.

मुलायम सिंग यादव यांना 22 ऑगस्टला हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते पण प्रकृती खालावत असल्याने 2 ऑक्टोबरला त्यांना आयसीयू मध्ये हलवण्यात आले होते. मात्र आज सकाळी 8 ते 8.30 च्या दरम्यान त्यांचं निधन झाले आहे.

अखिलेश यादव यांचे ट्वीट

मुलायम सिंह यादव हे एक कसलेले भारतीय राजकारणी आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक-आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पद तीन वेळेस भूषवले आहे. त्यांना संसदीय राजकारणाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. ते काही काळ संरक्षणमंत्री देखील होते. मुलायम सिंह यादव हे सध्या लोकसभेत मैनपुरी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. या आधी त्यांनी आझमगढ आणि संभल मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले आहेत. पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते त्यांना नेताजी ( हिंदीत आदरणीय नेता) असे संबोधतात.

समाजवादी नेते राममोहन लोहिया यांचे ते शिष्य होते. त्यांचा  जन्म 22 नोव्हेंबर 1939 रोजी उत्तर प्रदेशच्या इटावा जिल्ह्यातील सैफई गावात मूर्ति देवी आणि सुघर सिंह  यांच्या शेतकरी कुटुंबात झाला होता. 4 ऑक्टोबर 1992 रोजी त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. मुलायम सिंह यांचा केंद्रीय राजकारणात प्रवेश 1996 मध्ये झाला. जेव्हा काँग्रेस पक्षाचा पराभव करून संयुक्त आघाडीने सरकार स्थापन केले. एचडी देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील या सरकारमध्ये त्यांना संरक्षणमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती.



संबंधित बातम्या

Superstition: पितृत्व प्राप्त करण्यासाठी जिवंत कोंबडीचे पिल्लू गिळले, तरूणाचा मृत्यू; छत्तीसगडमधून अंधश्रद्धेची धक्कादायक घटना समोर

ZIM vs AFG 1st ODI 2024 Preview: अफगाणिस्तान क्रिकेट संघ पहिल्या वनडेत झिम्बाब्वेशी भिडणार; सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील जाणून घ्या

PAK vs SA 1st ODI 2024 Mini Battle: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिल्या वनडेच्या मिनी बॅटलमध्ये होणार चुरशीची स्पर्धा, हे खेळाडू सामन्याचा निर्णय बदलू शकतात

PAK vs SA 1st ODI 2024 Preview: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना पार्लमध्ये खेळला जाणार, सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंगसह सर्व तपशील घ्या जाणून