Muhurat Trading 2020: आज लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मुंबई शेअर बाजारात कधी होणार मुहूर्त ट्रेडिंग? जाणून घ्या महत्त्वाच्या वेळा!

आर्थिक भरभराट व्हावी म्हणून काही काळासाठी आर्थिक व्यवहार विशिष्ट मुहूर्तावर खुली केली जातात.

Muhurat Trading. (Photo Credit: File Image)

भारतामध्ये लक्ष्मीपुजनाच्या (Laxmi Pujan) दिवशी मुहूर्त ट्रेडिंग (Muhurat Trading ही जुनी परंपरा आहे. इंडियन स्टॉक मार्केट मध्ये केली जाणारी ही पूजा आगामी आर्थिक वर्षामध्ये समृद्धी, आर्थिक संपन्नता यावी या कामनेसह केली जाते. आर्थिक भरभराट व्हावी म्हणून काही काळासाठी आर्थिक व्यवहार विशिष्ट मुहूर्तावर खुली केली जातात. दिवाळीच्या आणि प्रामुख्याने लक्ष्मी पुजनाच्या दिवशी दिवसभर ट्रेडिंग बंद असतं. शेअर बाजार बंद असतो परंतू संध्याकाळी केवळ तासाभरासाठी हे मुहूर्त ट्रेडिंग खुले केले जाते. Laxmi Pujan 2020 Date: यंदा लक्ष्मी पूजन कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी.

ट्रेडिंग सुरू करण्यापूर्वी दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने पुजा केली जाते. लक्ष्मी मातेचा आशिर्वाद घेऊन या दिवशी तासभर ट्रेडिंगच्या आधी चोपडा पूजन करून व्यवहाराची नवी नोंदवही पुजली जाते. Happy Diwali 2020 Wishes: दिवाळी शुभेच्छा मराठी संदेश WhatsApp Status,Facebook Messages द्वारा शेअर करत द्विगुणित करा प्रियजनांचा दीपावलीचा आनंद.

मुहूर्त ट्रेडिंग 2020 ची वेळ :

मुंबई शेअर बाजारात यंदा दिवाळी व लक्ष्मीपुजनाच्या दिवशी म्हणजे 14 नोव्हेंबरला प्री ओपन सेशन संध्याकाळी 6 ते 6.08 या वेळेत केले जाणार आहे. त्यानंतर मुहूर्त ट्रेडिंग संध्याकाळी 6 वाजून 15 मिनिटं ते 7 वाजून 15 मिनिटं असं तासाभरासाठी असेल. ब्लॉक डील विंडो हा संध्याकाळी 5 वाजून 45 मिनिटं ते 6 वाजेपर्यंत 15 मिनिटांसाठी खुला असेल. कॉल ऑक्शन संध्याकाळी 6.20 ते संध्याकाळी 7.05 यावेळेत होईल. तर पोस्ट क्लोसिंग हे 7.25 ते 7.36 यावेळेत होणार आहे.

BSE मध्ये मुहूर्त ट्रेडिंगची सुरूवात 1957 पासून सुरू झाली आहे. NSE मध्ये त्याची सुरूवात 1992 पासून झाली. दिवाळीच्या सणामध्येच नववर्षाची सुरूवात होते. पाडव्याला व्यापारांचं नवावर्ष सुरू होतं त्यामुळे या दिवसांत व्यापार जेथे होतो तेथे पूजा करण्याची प्रथा आहे.