MS Dhoni, Bhuvan Bam जाहिरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सेलिब्रेटींमध्ये अव्वल- एएससीआय

MS Dhoni

जाहिरात स्वयं-नियामक संस्था ASCI बुधवारी माहिती देताना म्हटले की, जाहिरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सेलिब्रेटींमध्ये एमएस धोनी (MS Dhoni) आणि युट्युबबर (YouTuber) भुवन बाम (Bhuvan Bam) हे अव्वल आहेत. असे अनेक सेलिब्रेटी खेळाडू आहेत जे कटोर परिश्रमाची चाचण देण्यात अयशस्वी ठरले आहे. आशा सेलिब्रेटींची एक यादीच एएससीआयने प्रसिद्ध केली आहे. ज्यात धोनी आणि भुवन यांचा सर्वाथ वरचा क्रमांक आहे. जाहिरात स्वयं-नियामक संस्था ASCI ने बुधवारी माहिती दिली की सेलिब्रिटींच्या विरोधात तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे आणि त्यापैकी बरेच जण योग्य परिश्रमाचा कोणताही पुरावा सादर करण्यात अयशस्वी झाले आहेत. नियामक मंडळाने आवश्यक परिश्रम न घेतलेल्या सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आणि क्रिकेटर एमएस धोनी या यादीत शीर्षस्थानी होता, त्यानंतर विनोदी यूट्यूबर भुवन बामचा क्रमांक लागतो.

ASCI ने दावा करत म्हटले आहे की, या सेलिब्रेटींविरोधात करण्यात आलेल्या तक्रारींमध्ये पाठिमागच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. जसे की, पाठिमागच्या वर्षी साधारण 55 तक्रारी होत्या त्यात आता त्या तब्बल 803% वाढून 503 जाहिरातींवर गेल्या आहेत. (हेही वाचा, PBKS vs DC: दिल्ली कॅपिटल्सने केला पंजाबचा 15 धावांनी पराभव)

सेलिब्रेटींनी जाहिरातींमध्ये दिसल्यांतर आवश्यक मेहनत घेणे आवश्यक असल्याचे ग्राहक संरक्षण कायदा सांगतो. मात्र, ASCI द्वारे प्रसिद्ध माहिती सांगते की, 97 टक्के प्रकरणांमध्ये ही मंडळी कोणत्याही प्रकारे पाहिजे तशी मेहनत करताना आढळत नाहीत.

दरम्यान, नियामक मंडळाने म्हटले आहे की एमएस धोनी सेलिब्रिटींच्या यादीत शीर्षस्थानी आहे जे आवश्यक मेहनत करण्यात अयशस्वी ठरले आहेत आणि नियमांचे पालन न करण्याच्या दहा प्रकरणांमध्ये वैशिष्ट्यीकृत आहेत