Ujjain Murder Case: लग्नानंतर आईचे निर्बंध...कुऱ्हाडीने वार करून मुलाने जीवे मारले; मृतदेह जंगलात फेकला

मध्य प्रदेशातील उज्जैनमधून एक हादरवून सोडणारी घटना उघडकीस आली आहे. मुलाने त्याच्या आईची निर्घृण हत्या केली. आरोपी मुलाने प्रथम त्याच्या आईचा गळा दाबून खून केला आणि नंतर कुऱ्हाडीने हल्ला करून मृतदेहाचे तुकडे केली.

Death प्रतिकात्मक फोटो Photo Credit- X

Ujjain Murder Case: मध्य प्रदेशातील उज्जैनमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाने त्याच्या आईचा गळा दाबून (Mother Murder) खून केला. गळा दाबल्यानंतर, आरोपी मुलाला वाटले की आई वाचू शकेल, म्हणून त्याने आईचा मृतदेहाचे कुऱ्हाडीने तुकडे (Ujjain Mother Murder Case) केले. आईची हत्या केल्यानंतर, आरोपी मुलाने मृतदेह जंगलात फेकून दिला. आरोपी मुलाने आईच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याच्या मित्रांचीही मदत घेतली. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.

मृत महिलेचे नाव कमलाबाई असे होते. त्या दुनालाजा गावातील रहिवासी होत्या. गेल्या काही दिवसांपासून महिला घरातून बेपत्ता होती असे आजूबाजूच्या नागरिकांनी सांगितले. आरोपी मुलाचे नाव अर्जुन असे आहे. आरोपीने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले की, लग्नापासून त्याची आई त्याला सतत थांबवत होती. त्याने त्याच्या आईला असे करू नये म्हणून अनेक वेळा सांगितले होते. परंतु तरीही त्याची आई ऐकत नसल्यामुळे तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाला आणि त्याच्या मामाचा मुलगा रितेशसोबत मिळून कमलाबाईचा गळा दाबून खून केला आणि नंतर कुऱ्हाडीने वार करून तिची हत्या केली.

उज्जैन जिल्ह्यातील उन्हेल पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे. ज्यामध्ये पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. तर त्याचे दोन साथीदार अजूनही फरार आहेत. 27 मे रोजी उन्हेल पोलीस स्टेशन परिसरातील स्मशानभूमीजवळून गादीत गुंडाळलेल्या महिलेचा मृतदेह पोलिसांना आढळला. मृत महिलेच्या मानेवर खुणा असण्यासोबतच तिच्या शरीरातून रक्तस्त्राव होत होता. हे प्रकरण गांभीर्याने घेत पोलिसांनी तात्काळ अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि हत्येचा तपास सुरू केला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement