Most Expensive State in India: गुजरात ठरले भारतातील सर्वात महाग राज्य; जाणून घ्या महाराष्ट्राचे स्थान
मोठ्या शहरांमध्ये तर अशा गोष्टींची किंमत आणखी जास्त आहे. अर्थात हे राज्यानुसार बदलते. गुजरात (Gujarat) आणि महाराष्ट्र (Maharashtra) ही देशातील सर्वात महागडी राज्ये आहेत.
Most Expensive State in India: देशात महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. गरीबच नव्हे तर उच्च मध्यमवर्गीयांनाही आपले उत्पन्न आणि खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न पडू लागला आहे. लोकांच्या मूलभूत गरजांच्या किमतीही वाढत आहेत. मोठ्या शहरांमध्ये तर अशा गोष्टींची किंमत आणखी जास्त आहे. अर्थात हे राज्यानुसार बदलते. गुजरात (Gujarat) आणि महाराष्ट्र (Maharashtra) ही देशातील सर्वात महागडी राज्ये आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये राहणाऱ्या लोकांचा खर्च तुलनेने जास्त आहे. गुजरातमध्ये श्रीमंत, मध्यमवर्गीय आणि गरीबांचा सरासरी मासिक खर्च 46,800 रुपये आहे, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये तो 45,400 रुपये आहे.
या तुलनेत हिमाचल प्रदेशातील लोकांचा सरासरी मासिक खर्च सर्वात कमी 23,600 रुपये आहे. बिहारही त्यामानाने 'स्वस्त' आहे. फिनशॉट्सच्या एका अहवालात ही बाब समोर आली आहे.
देशातील पाच सर्वात 'महाग' राज्ये (आकडे हजारात)-
गुजरात (46.8)
महाराष्ट्र (45.4)
मिझोराम (43.5)
कर्नाटक (43.2)
हरियाणा (39.8)
पाच स्वस्त राज्ये (आकडे हजारात)-
हिमाचल प्रदेश (23.6)
बिहार (25.9)
ओडिशा (26.4)
झारखंड (28.3)
पुद्दुचेरी (28.4)
(हेही वाचा: No-Married Women: 'विवाहित महिलांना नोकरी नाही'; Foxconn च्या भारतामधील कारखान्यात मोठा भेदभाव- Reports)
दुसरीकडे, मुंबई आता आशियातील प्रवासींसाठी 21 व्या क्रमांकाचे सर्वात महागडे शहर, तर दिल्ली 30 वे महागडे शहर ठरले आहे. एका सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. जागतिक स्तरावर, सर्वेक्षण केलेल्या 226 शहरांमध्ये मुंबई 136 व्या क्रमांकावर आहे. हाँगकाँग, सिंगापूर, झुरिच, जिनेव्हा, बर्न, न्यूयॉर्क सिटी, लंडन, नासाऊ आणि लॉस एंजेलिस ही जगातील टॉप 10 सर्वात महागडी शहरे आहेत. इतर महागड्या भारतीय शहरांमध्ये चेन्नई (189), बेंगळुरू (195), हैदराबाद (202), पुणे (205) आणि कोलकाता (207) यांचा समावेश होतो.