भारतीय वायुदलाच्या बेपत्ता IAF AN-32 विमानाचे अवशेष सापडले
डिफेंस पीआरओ विंग कमांडर रत्नाकर सिंग यांनी याबाबत माहिती दिली होती. बेपत्ता AN-32 विमानाची माहिती देणाऱ्या व्यक्तीला किंवा व्यक्तींच्या ग्रुपला हे बक्षीस देण्यात येणार होते.
Missing AN-32: भारतीय वायुदलाच्या बेपत्ता IAF AN-32 वमानाचे अवशेष सापडल्याचे वृत्त आहे. 3 जून 2019 पासून हे विमान बेपत्ता होते. या विमानात एकूण 13 लोक होते. असम येथील जोरहाट एअरबेस येथून अरुणाचल प्रदेश राज्यातील मेन्चुका च्या दिशेने हे विमान झेपावले होते. त्यानंतर काही काळातच हे विमान बेपत्ता झालं.
दरम्यान, या विमानाचा शोध घेण्यासाठी भारतीय वायुलदलाने प्रंचंड मेहनत घेतली होती. तसेच, IAF AN-32 या विमानाबाबत माहिती देणाऱ्या व्यक्तीस पाच लाख रुपयांचे इनामही घोषीत करण्यात आले होते. डिफेंस पीआरओ विंग कमांडर रत्नाकर सिंग यांनी याबाबत माहिती दिली होती. बेपत्ता AN-32 विमानाची माहिती देणाऱ्या व्यक्तीला किंवा व्यक्तींच्या ग्रुपला हे बक्षीस देण्यात येणार होते. ( हेही वाचा, भारतीय वायू सेनेचं AN-32 Aircraft बेपत्ता, विमानाच्या शोधासाठी इंडियन एअर फोर्सची सुखोई -30, सी - 130 रवाना)
एएनआय ट्विट
दरम्यान, विंग कमांडर रत्नाकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता विमानाची माहिती देण्यासाठी 0378-3222164, 9436499477, 9402077267, 9402132477 या क्रमांकांवर संपर्क साधायचा होता. या बेपत्ता विमानाचा शोध वायुसेना घेत आहे. त्याचबरोबर सेना, अरुणाचल प्रदेश सरकार आणि इतर एजेंसीज या विमानाचा शोध घेत होत्या.