श्रमिक स्पेशल ट्रेन आता अंतिम स्थानी पोहताचा 3 स्थानकांवर थांबू शकते, प्रवासी संख्येत वाढ करण्याची मुभा;Ministry of Railways कडून गाईडलाईन्समध्ये बदल
पूर्वी 1200 जागा घेतल्या जात होत्या आता त्याऐवजी 1700 प्रवासी घेतले जाऊ शकतात.
भारतामध्ये कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे ठप्प असलेल्या प्रवासी वाहतुकीमुळे अनेक स्थलांतरित मजुरांची मोठी गैरसोय होत आहे. मात्र लॉकडाऊनदरम्यानही या मजुरांना आपल्या मूळगावी नेण्यासाठी भारतीय रेल्वेकडून खास श्रमिक स्पेशल ट्रेन्स चालवल्या जात आहेत. आता त्याच्या गाईडलाईन्समध्ये बदल करण्यात आले आहे. ही ट्रेन आता अंतिम स्थानकादरम्यान जाताना कमाल 3 स्टेशनवर थांबू शकते. तर स्लीपर कोचच्या सार्या जागांवर प्रवासी घेतले जाऊ शकतात अशी माहिती देण्यात आली आहे. पूर्वी 1200 जागा घेतल्या जात होत्या आता त्याऐवजी 1700 प्रवासी घेतले जाऊ शकतात.
दरम्यान आज केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रशासनाच्या मुख्य सचिवांना एक पत्र लिहण्यात आलं आहे. त्याच्या द्वारा मजुरांची काळजी घ्या. त्यांना रेल ट्रॅक किंवा रस्त्यावरून चालायला देऊ नका. तसे आढळल्यास त्यांना समजावा. तसेच इतर राज्यामध्ये अडकलेल्या मजुरांच्या राहण्याची, खाण्याची, पिण्याची सोय करावी असे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान आता मजुरांसाठी विशेष श्रमिक ट्रेन्सच्या संख्येमध्येहि वाढ होणार आहे. काही दिवसांपूर्वीच प्रवासांच्या सोयीसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची सक्ती काढून टाकत केवळ शरीराचे तापमान थर्मल गनच्या माध्यमातून करून त्यांना जाण्यास परवानगी दिली जाणार आहे. Indian Railways कडून 15 पॅसेंजर रेल्वे गाड्या 12 मे पासून धावणार पहा irctc.co.in वर त्याचं E-Tickets कसं बुक कराल?
महाराष्ट्रातून उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश येथे जाण्यासाठी मजुरांच्या सोयीसाठी विशेष सोय करण्यात आली आहे. राज्यात सुमारे 6 लाखापेक्षा अधिक स्थलांतरित मजूर आहे.दरम्यान आत्तापर्यंत स्थलांतरित मजुरांसाठी देशभरात 468 स्पेशल ट्रेन्स चालवण्यात आल्या आहेत. दरम्यान आजपासून देशभरात ठराविक 15 गाड्यांच्या माध्यमातून प्रवासी वाहतूकदेखील सुरू केली जात आहे. 12 मेपासून या ट्रेन धावतील अशी माहिती देण्यात आली आहे.