तिकीट बुकींग कॅन्सलेशन, रिफंड संदर्भात भारतीय रेल्वेने जारी केली नवी नियमावली; 21 मार्च पासून रद्द झालेल्या तिकीटांचे मिळणार पूर्ण रिफंड
त्याद्वारे रिफंड मिळण्याचा कालावधी वाढवण्यात आला आहे.
कोरोना व्हायरसचा वाढता धोका टाळण्यासाठी घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सार्वजनिक वाहतूक सेवा ठप्प झाली. सर्व ट्रेन्स, लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द झाल्या. त्यामुळे तिकीट रद्द आणि रिफंड यासाठी भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. मार्च 21 पासून रेल्वे तिकीट बुक केलेल्यांना रिफंड करण्यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाने नवी नियमावली जारी केली आहे. रद्द झालेल्या ट्रेन्सचे PSR Counter Ticket बुकींचे रिफंड तुम्ही 6 महिन्यापर्यंत कधीही क्वाऊंटरवर जावून घेऊ शकता. हा कालावधी पूर्वी केवळ 3 दिवस होता. आता तो 6 महिन्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. रेल्वे नियमांनुसार ई-तिकीटांचे रिफंड ऑटोमेटीकली अकाऊंटमध्ये जमा होईल.
ट्रेन रद्द झाली नसल्यास आणि प्रवासी प्रवास करण्यास इच्छुक नसल्यास अशा प्रसंगात त्या तिकीटाचे पूर्ण रिफंड हे प्रवाशांना दिले जाईल. हा नियम PSR Counter Ticket आणि ई-तिकीट या दोघांनाही लागू होतो. PSR Counter Ticket धारण प्रवासी TDR (Ticket Deposit Receipt) प्रवासाच्या तारखेपासून 6 महिन्यांपर्यंत कधीही रेल्वे बुकींग काऊंटरवर जावून फाईल करु शकतो. Detailed TDR हा प्रवासाच्या 60 दिवसामध्ये चीफ एम ऑफिसर किंवा सीसीएम रिफंड ऑफिस येथे रिफंड घेण्यासाठी दाखल करु शकता. हा कालावधी पूर्वी 10 दिवस होता. परंतु, सध्याच्या परिस्थितीत तो वाढवून 60 दिवस इतका करण्यात आला आहे. ई-तिकीटसाठी रेल्वेच्या वेबसाईटवर ऑनलाईन कॅन्सलेशन आणि रिफंड फॅसिलिटी उपलब्ध आहे.
ANI Tweet:
PSR Counter Ticket हे IRCTC च्या वेबसाईटवरुनही रद्द करता येते. परंतु, रिफंड घेण्यासाठी रेल्वे तिकीट बुकींग क्वाऊंटरवर जावे लागेल. 21 मार्च 2020 पासून रद्द झालेल्या सर्व ट्रेन्सच्या तिकीटांचे पूर्ण रिफंड प्रवाशांना देण्यात येणार आहे. तसंच यापूर्वी तिकीट कॅन्सल केलेल्यांचे कॅन्सलेशन चार्जेस कट होऊन रिफंड करण्यात आले आहे. असे प्रवासी कॅन्सलेशन चार्जेस परत घेण्यासाठी पुन्हा अप्लाय करु शकतात. मात्र त्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. ई-तिकीट्सचे कॅन्सलेशन चार्जेस डिटक्ट झालेल्या प्रवाशांच्या खात्यात थेट पैसे जमा होतील. त्यांना अप्लाय करण्याची गरज नाही.