खुशखबर! रेल्वे मंत्रालयाकडून सणासुदीच्या काळात 20 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान 196 विशेष गाड्या सोडण्याची घोषणा

रेल्वे मंत्रालयाने आज ही महत्त्वाची घोषणा केल्याने या सणांसाठी आपल्या आप्तलगांकडे तसेच गावी जाण्याची इच्छा पूर्ण होणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयाचे जनतेने स्वागत केले असून लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Indian Railway | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) देशात सुरु असलेला लॉकडाऊन (Lockdown) आता अनलॉकच्या (Unlock) टप्प्यात आला असून हळूहळू एक एक सेवा सुरु होत आहेत. तसेच कोरोना व्हायरसमुळे यंदा नागरिकांच्या अनेक सणांवर विरजण पडले. तसेच रेल्वे सेवा सुरु नसल्याने आपल्या आप्तलगांकडे जाता आले नाही त्यामुळे अनेकांची निराशा झाली. मात्र आता ऑक्टोबर , नोव्हेंबर महिन्यात नवरात्री, दसरा आणि दिवाळी यांसारखे महत्त्वाचे असे मानले जाणारे भारतीय सण असल्यामुळे रेल्वे मंत्रालयाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यात रेल्वे मंत्रालयाकडून (Ministry Of Railway ) सणासुदीच्या काळात 20 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान 196 विशेष रेल्वे गाड्या (Special Railway) सोडण्यात येणार आहे.

रेल्वे मंत्रालयाने आज ही महत्त्वाची घोषणा केल्याने या सणांसाठी आपल्या आप्तलगांकडे तसेच गावी जाण्याची इच्छा पूर्ण होणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयाचे जनतेने स्वागत केले असून लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. Mumbai Local Updates: मुंबई लोकलच्या मध्य रेल्वे मार्गावरील ट्रेन्समध्ये गर्दी टाळण्यासाठी आजपासून 68 अधिक फेर्‍या वाढवल्या; सोशल डिस्टंसिंग पाळण्याचं आवाहन

 Ministry of Railways approves Zonal Railways' proposal for the operation of 196 pairs of Festival Special trains. The trains will be operated between 20th October to 30th November. The fare applicable for these services will be that applicable for special trains. pic.twitter.com/Xa6XvncgVd

सणासुदीच्या काळात रेल्वे मंत्रालयाने सोडलेल्या या विशेष 196 गाड्यांचे भाडे हे या सेवांसाठी असलेल्या भाड्यांप्रमाणेच असणार आहे अशी माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे.

दरम्यान मुंबई लोकलमध्ये गर्दी टाळत सोशल डिस्टंसिंग (Social Distancing) पाळण्याचे आवाहन करत 24 सप्टेंबरपासून मध्य रेल्वेने (Central Railway) 68 अधिक फेर्‍या चालवत असल्याची घोषणा केली. तसेच 28 सप्टेंबरपासून मुंबई मध्ये पश्चिम रेल्वे मार्गावर 2 महिला विशेष (Ladies Special) आणि 4 अन्य फेर्‍या वाढवल्या आहेत. दरम्यान मास्क घालणं, सोशल डिस्टंसिंग पाळणं गरजेचे आहे. तसेच या अधिकच्या रेल्वे फेर्‍यांमधून केवळ राज्य सरकारने परवानगी देण्यात आलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि परीक्षार्थींना परवानगी असेल. सामान्य मुंबईकरांना अद्याप मुंबई लोकल मधून प्रवास करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिलेली नाही. त्यामुळे मुंबईकरांनी कोरोना संकटकाळात बाहेर पडताना विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now