मुंबईत गूळवेली च्या सेवनाने यकृताला इजा झाल्याचे मीडीया रिपोर्ट्स हे दिशाभूल करणारे वृत्त; आयुष मंत्रालयाचा खुलासा
वृत्तपत्रातील संपूर्ण लेख टी.कॉर्डिफोलियाच्या कार्यक्षमतेबद्दलच्या अत्यंत सीमित आणि भ्रामक अभ्यासावर,परंतु त्याच्यावरील विशाल संशोधनात्मक अभ्यासपूर्ण विवेचनाचा संदर्भ लक्षात न घेता,सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ञांचा किंवा आयुष मंत्रालयाचा सल्ला घेतल्याशिवाय, लिहिलेला आहे. असे नमूद करण्यात आले आहे.
यकृताच्या अभ्यासासाठी असलेल्या जर्नल ऑफ क्लिनिकल अँड एक्सपेरिमेंटल हिपॅटोलॉजी (Journal of Clinical and Experimental Hepatology) या इंडियन नॅशनल असोसिएशनच्या सदस्याच्या अभ्यासासाठी संदर्भ म्हणून प्रसिद्ध होणार्या पत्रिकेमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यास लेखावर आधारित बातमीच्या संदर्भात आयुष मंत्रालयाने हा खुलासा केला आहे. टिनोस्पोरा कॉर्डीफोलिया (टीसी), ज्याला सामान्यत: गूळवेल / गिलोय किंवा गुडुची (Giloy) म्हणून ओळखले जाते,त्या वनस्पतीच्या सेवनामुळे मुंबईतील सहा रुग्णांचे यकृत निकामी (Liver Damage) झाले असे अभ्यासलेखात नमूद केले आहे.
याचा अभ्यास करणाऱ्या लेखकांना या प्रकरणातील सर्व आवश्यक तपशील पद्धतशीरपणे मांडण्यात अपयश आले आहे. या व्यतिरिक्त, गूळवेल (गिलोय) किंवा टीसी याचा संबंध यकृताच्या इजेशी जोडणे दिशाभूल करणारे आणि आपत्तीजनक आहे कारण गूळवेल किंवा गुडुची ही वनस्पती भारतीय पारंपरिक औषध प्रणाली असलेल्या आयुर्वेदात बर्याच काळापासून वापरली जात आहे. विविध आजारांवर उपचार करण्यासाठी टीसी अर्थात गुळवेलीची परीणामकारकताआधीपासून सिध्द झाली आहे.
या अभ्यासाच्या लेखकांनी या औषधी वनस्पतींच्या अंतर्भूत घटकांचा , रूग्णांनी घेतलेल्या मात्रांचा विश्लेषक अभ्यास केलेला नाही असे अभ्यासाचे विश्लेषण केल्यावर लक्षात आले आहे . टीसी अर्थात गुळवेलच हे सिध्द करण्यासाठी लेखकांनी वनस्पतिशास्त्रज्ञांचे मत घेणे किंवा आयुर्वेद तज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक होते. Health Benefits Of Giloy: रोगप्रतिकार शक्ति वाढवण्यासाठी अमृत समजली जाते गुळवेल; जाणून घ्या 5 महत्वाचे फायदे .
खरे पहाता , असे अनेक अभ्यास आहेत ज्यात असे निर्दशनास आले आहे, की औषधी वनस्पती योग्यप्रकारे न ओळखता आल्यामुळे चुकीचे परिणाम होऊ शकतात.टिनोस्पोरोक्रिस्पा या गुळवेलीसारख्या दिसणार्या औषधी वनस्पतीचा यकृतावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. गूळवेल (गुडुची) सारख्या वनौषधीवर असा विषारी असल्याचा शिक्का मारण्यापूर्वी, लेखकांनी प्रमाणित मार्गदर्शक सूचना वापरून त्या वनस्पतींचा योग्य परिचय करून घेणे आवश्यक आहे. त्यांनी तसे केले नाही. याखेरीज, सदर अभ्यासात इतरही अनेक त्रुटी आहेत.
रुग्णांनी या वनस्पतीची किती मात्रा घेतली किंवा इतर औषधांच्या सह या औषधी वनस्पतीचे सेवन केले होते अथवा नाही हे अस्पष्ट आहे. त्याचप्रमाणे या अभ्यासामध्ये रुग्णांच्या पूर्वीच्या किंवा सध्याच्या वैद्यकीय आजारविषयक नोंदी विचारात घेतलेल्या नाहीत.अपूर्ण माहितीवर आधारित प्रकाशनांतून चुकीची माहिती दिली गेली तर चुकीची माहिती पसरून आयुर्वेदासारख्या प्राचीन उपचार पद्धतींची बदनामी होत राहील.
यकृत, मज्जातंतू इत्यादींसाठी संरक्षणात्मक म्हणून गूळवेल (टीसी) किंवा गिलॉय यांच्या वैद्यकीय अनुप्रयोगांचे वैज्ञानिक पुरावे उपलब्ध आहेत, हे येथे सांगणे उचित नाही. ‘गुडुचिआनंद सुरक्षा’ या शब्दाअंतर्गत (कीवर्ड) म्हणून सुमारे 169 अभ्यास अहवाल सार्वजनिक अभ्यासक्षेत्रात उपलब्ध आहेत . त्याचप्रमाणे, टी. कॉर्डीफोलिया आणि तिचा औषधी प्रभावीपणा यावर द्रुतगतीने शोध,घेतल्यास कीवर्ड म्हणून, 871 परीणाम पहाता येतील.गूळवेल आणि त्याच्या सुरक्षित वापराबद्दल इतर शेकडो अभ्यास अहवाल उपलब्ध आहेत. गूळवेल हे आयुर्वेदातील सर्वात प्रमाणित निर्धारित औषधांपैकी एक आहे. त्याचे यकृताच्या संरक्षणासाठी असलेले गुणधर्म औषधशास्त्रीय मानकांनुसार (pharmacopoeia) योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे. कोणत्याही प्रत्यक्ष रुग्णोपचारांवेळी (क्लिनिकल प्रॅक्टिस) किंवा औषधे दक्षता निवारण (फार्माकोविजिलेन्स)पध्दतीद्वारे केलेल्या कोणत्याही अभ्यासात कोणतीही प्रतिकूल घटना या वनस्पती सेवनामुळे घडली असल्याची कुठेही नोंद नाही.
वृत्तपत्रातील संपूर्ण लेख टी.कॉर्डिफोलियाच्या कार्यक्षमतेबद्दलच्या अत्यंत सीमित आणि भ्रामक अभ्यासावर,परंतु त्याच्यावरील विशाल संशोधनात्मक अभ्यासपूर्ण विवेचनाचा संदर्भ लक्षात न घेता,सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ञांचा किंवा आयुष मंत्रालयाचा सल्ला घेतल्याशिवाय, लिहिलेला आहे. हे पत्रकारितेच्या मानदंडांच्या दृष्टिकोनातून देखील योग्य नाही.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)