पुणे येथील विषाणू शास्त्रज्ञ मीनल भोसले यांच्याकडून भारतातील पहिल्या COVID-19 Testing Kit चा शोध

भारतामध्ये लोकांची कोरोना व्हायरसच्या चाचणीचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा खूपच कमी आहे. परंतु, पुण्यातील एका विषाणू शास्त्रज्ञ मीनल भोसले हिच्या संशोधनातून ही परिस्थिती आता बदलणार आहे. गुरुवारी (26 मार्च) पहिले भारतीय बनावटीचे कोरोना व्हायरस टेस्टिंग किट लॉन्च करण्यात आले.

Minal Bhosale, Woman who made First COVID-19 Testing Kit in India (Photo Credits: Facebook)

संपूर्ण जगात हाहाकार घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा (Coronavirus) विळखा भारत देशालाही बसला आहे. यातून बाहेर पडण्याचा मार्ग सारेच शोधत आहेत. मात्र कोणाच्याही प्रयत्नांना म्हणावे तसे यश प्राप्त झालेले नाही. त्यामुळे कोरोना विषाणूंचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन (Lockdown) घेण्यात आला आहे. दरम्यान भारतामध्ये कोरोना व्हायरसच्या चाचणीचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा खूपच कमी आहे. परंतु, पुणे (Pune) येथील विषाणू शास्त्रज्ञ (Virologist) मीनल भोसले (Minal Bhosale) यांच्या संशोधनातून ही परिस्थिती आता बदलणार आहे. गुरुवारी (26 मार्च) रोजी पहिले भारतीय बनावटीचे कोरोना व्हायरस टेस्टिंग किट (COVID-19 Testing Kit) लॉन्च करण्यात आले. या किटच्या मदतीने कोरोना व्हायरसची चाचणी लवकर करण्यात मदत होईल. कीट तयार करण्यासाठी मीनल भोसले आणि तिच्या टीमने तब्बल 6 आठवडे काम केले.

मायलॅब डिस्कव्हरी (Mylab Discovery) या पुण्यातील लॅबला कोरोना व्हायरस टेस्टिंग किट बनवण्याचा आणि विकण्याचा परवाना मिळाला आहे. हा परवाना मिळालेली ही भारतातील पहिली लॅब ठरली आहे. त्यांनी 150 कीट पुणे, मुंबई, दिल्ली, गोवा आणि बंगलोर मधील वेगवेगळ्या डायनोस्टीक लॅब (Diagnostic Lab) मध्ये पाठवले आहेत. प्रत्येक कीटमध्ये 100 Sample Test होऊ शकतात. या एका कीटची किंमत 1200 रुपये आहे. सध्या कोरोनाच्या टेस्टसाठी वापरण्यात येणारे कीट परदेशातून मागवण्यात येत असून त्याची किंमत 4500 रुपये आहे. त्या तुलनेत भारतीय बनावटीचे हे कीट माफक दरात उपलब्ध आहे. विशेष म्हणजे परदेशातून येणाऱ्या कीटद्वारे होणाऱ्या चाचणीचे रिपोर्ट्स येण्यासाठी 6-7 तासांचा कालावधी लागतो. तर मीनल भोसले यांच्या कीटद्वारे हे काम अवघ्या अडीच तासात करणे शक्य होणार आहे. डायग्नोसिस कंपनीने दिलेल्या माहितीनुसार येत्या आठवड्यात ते 1 लाख कीट उपलब्ध करु शकतात. (पहा, असा दिसतो Covid-19 विषाणू; भारतीय शास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच टिपला Coronavirus चा फोटो; लस शोधण्यासाठी होणार फायदा)

मीनल भोसले यांनी हे कीट 18 मार्च रोजी नॅशनल इंस्टिट्यूड ऑफ व्हिरोलॉजी (National Institute of Virology) येथे सादर केले. या दरम्यान त्या प्रेन्गेंट असून 19 मार्च रोजी त्यांनी आपल्या मुलीला जन्म दिला. कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या कठीण परिस्थितीत मीनल भोसले यांचा हा यशस्वी प्रयत्न नक्कीच एक आशेचा किरण ठरणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now