Militant Attack in Manipur: मणिपूरमध्ये अतिरेक्यांकडून मोठा हल्ला, असम राइफलचे कमांडिग अधिकारी, पत्नी-मुलासह 7 जणांचा मृत्यू
ही घटना चूडाचांदपुर जिल्ह्यातील सिनघाट सब डिव्हिजनमध्ये घडली आहे.
Militant Attack in Manipur: पूर्वोत्तरीय राज्य मणिपूर येथे सुरक्षा बलाच्या जवानांच्या ताफ्यावर अतिरेक्यांकडून मोठा हल्ला करण्यात आला आहे. ही घटना चूडाचांदपुर जिल्ह्यातील सिनघाट सब डिव्हिजनमध्ये घडली आहे. अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात 46 असम राइफल्सचे कमांडिग ऑफिसर, त्यांची पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला आहे.(Jammu-Kashmir Update: कुलगाममधील चावलगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, एक दहशतवादी ठार)
मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी या प्रकरणी दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विट करत असे म्हटले की, जे कोणी दोषी असतील त्यांना माफ केले जाणार नाही. पॅरा मिलिट्री आणि राज्यातील सुरक्षा बलाकडून अतिरेक्यांचा शोध घेऊन त्यांना जागीच लावण्याचे काम करण्यास सुरु केले आहे.
Tweet:
त्याचसोबत राजनाथ सिंह यांनी सुद्धा याबद्दल ट्विट केले आहे. असम रायफल मधील 5 जणांचा मृत्यू आणि त्यामधील दोघांनी जीव गमावल्याने राजनाथ सिंह यांनी दु:ख व्यक्त केले आहे.(Jammu Kashmir Update: श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी केली पोलीस कर्मचाऱ्याची हत्या, हल्लेखोरांचा शोध सुरू)
Tweet:
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, आधीच घुसखोरी केलेल्या अतिरेक्यांना हा हल्ला केला आहे. असम राइफल्स युनिटच्या ताफ्यात क्युआरटी (QRT) टीमसोबतच कमांडिग ऑफिसर आणि त्यांचा परिवार होता. या घटनेनंतर संपूर्ण परिसराला घेराव घातला असून शोधकार्य सुरु करण्यात आले आहे.