MiG-21 Fighter Jet Tyre Burst: मिग-21 फायटर जेट विमानाचा टायर फुटला, कोणतीही जीवितहानी नाही, गोवा विमानतळावरील घटना
ही घटना गोवा राज्यातील दाबोलिम विमानतळावर (Dabolim airport in Goa) घडली.
भारतीय नौदलाच्या मिग-29 के लढाऊ विमानाचा टायर फुटला (MiG-21 Fighter Jet Tire Burst) आहे. ही घटना गोवा राज्यातील दाबोलिम विमानतळावर (Dabolim airport in Goa) घडली. सिंगल पायलट असलेले हे विमान टायर फुटल्यामुळे अडकून पडले असले तरी कोणालाही कोणतीही दुखापत झाली नाही. हे विमान नियोजित वेळेनुसार हवेत झेपावणार होते. तत्पूर्वीच ही घटना घडली. या घटनेनंतर विमानतळाची धावपट्टी दुपारी 4 वाजेपर्यंत तात्पुरती बंद ठेवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्यामुळे प्रवाशांच्या उड्डाण सेवांमध्ये काही काळ व्यत्यय निर्माण झाला. अग्निशमन दलासह आपत्कालीन सेवांनी जवानांची आणि विमानाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि सर्व सेवा पूर्ववत करण्यासाठी तातडीने आवश्यक ती कृती केली.
नौदलाच्या प्रवक्त्याने घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, मिग-29 के हे टॅक्सीवेवर त्याच्या नेहमीच्या उड्डाणाच्या तयारीसाठी उभे होते. नियोजीत वेळानुसार हे विमान उड्डाण भरणार होते. मात्र तत्पूर्वीच त्याचा टायर फूटला. टायर फुटल्यानंतर विमान धावपट्टीवरच उडकून पडले. त्यामुळे ते सुरक्षितपणे दूर हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इतर विमानांची वाहतूक निर्धोक आणि पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, कोणताही धोका टाळण्यासाठी दाबोलीम विमानतळावरील धावपट्टी तात्पुरती बंद करण्यात आली.त्यामुळे दुपारी ४ वाजेपर्यंत उड्डाण संचालनावर परिणाम झाला. परिस्थिती हाताळण्यासाठी काही उड्डाणे मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर रीडायरेक्ट करण्यात आली आहेत. (हेही वाचा, मुंबई विमानतळावर धावपट्टीवर उतरताना SpiceJet च्या विमानाचा टायर फुटला; कोणतीही हानी नाही)
दाबोलिम विमानतळाचे संचालक एस व्ही टी धनमजया यांनी धावपट्टी तात्पुरती बंद आणि उड्डाणे वळवण्यावर जोर देत वाहतूक पूर्ववत करण्यावर अधीक भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, विमानतळावर विमानाचे टायर फुटण्याची ही पहिलीच वेळनाही. या आधीही विमानाचे टायर फुटण्याची घटना विमानतळांवर घडल्या आहेत.
Mikoyan-Gurevich MiG-21 हे एक सुपरसोनिक जेट फायटर आणि इंटरसेप्टर विमान आहे. त्याला डेल्टा विंग असून "बालाइका" असे त्याचे टोपणनाव आहे कारण. हे विमान एका रशियन तंतुवाद्य सारखे असल्याने त्याला हे नाव देण्यात आले आहे. मिग-21 ची रचना सोव्हिएत युनियनमधील मिकोयान-गुरेविच डिझाईन ब्युरोने केली होती. हे मूलतः एक विशेष डेलाइट इंटरसेप्टर होते, परंतु नंतर ते विविध मोहिमांसाठी सुधारित केले गेले. मिग-21 हे सिंगल-इंजिन असलेले विमान आहे. विविध कामांसाठी हे विमान वापरले जाते.