Mhada Houses Goregaon Mumbai: मुंबई येथील गोरेगाव परिसरात म्हाडाची आणखी 2500 घरे

मुंबईमध्ये (Mumbai) घर खरेदी करण्याची इच्छा आहे. परंतू तितके बिजेट नाही. किंवा गुंतवणूक म्हणून घर खरेदी कराचे आहे, अशा लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई शहरातील गोरेगाव (Goregaon) येथे म्हाडाची आणखी 2500 घरे उपलब्ध होणार आहेत. म्हाडाच्या मुंबई मंडळ नवीन गृहप्रकल्प लवकरच हाती घेणार आहे. जो गोरेगाव येथे उभारला जाणार आहे.

Mhada Houses Goregaon Mumbai: मुंबई येथील गोरेगाव परिसरात म्हाडाची आणखी 2500 घरे
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : PTI)

मुंबईमध्ये (Mumbai) घर खरेदी करण्याची इच्छा आहे. परंतू तितके बिजेट नाही. किंवा गुंतवणूक म्हणून घर खरेदी कराचे आहे, अशा लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई शहरातील गोरेगाव (Goregaon) येथे म्हाडाची आणखी 2500 घरे उपलब्ध होणार आहेत. म्हाडाच्या मुंबई मंडळ नवीन गृहप्रकल्प लवकरच हाती घेणार आहे. जो गोरेगाव येथे उभारला जाणार आहे. येथील पश्चिम परिसरात असलेल्या सिद्धार्थ नगर (पत्राचाळ) पुनर्विकासाअंतर्गत विस्तीर्ण भूखंड उपलब्ध झाला आहे. त्यावर हा प्रकल्प राबविण्याचा म्हाडाचा विचार झाला आहे. या प्रकल्पात अत्यल्प, अल्प आणि मध्यम गटासाठी घरे असणार आहेत.

पहिल्या टप्प्यामध्ये 1500 घरे

गोरेगाव येथील प्रकल्प एकूण दोन टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये म्हाडा 1500 घरे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यासाठी लवकरच निवीदा काढली जाण्याची शक्यता आहे. वास्तविक पाहता हा प्रकल्प पत्राचाळ वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पातून होणार होता. त्यातील म्हाडाकडून मुंबई मंडळाला आपल्या हिश्श्यातील 2700 घरे ही विकासकाकडून सोडतीसाठी उपलब्ध होणार होती. मात्र, दरम्यानच्या काळात हा एकूण प्रकल्पच वादाच्या भोवऱ्यात अडकला. विकासकाने हा प्रकल्प अर्ध्यावरच सोडला तसेच या प्रकल्पात गैरव्यवहार झाल्याचेही आरोप झाले. परिणामी हा प्रकल्प रखडला आणि बराच लांबला. आता वादात अडकलेला हा प्रकल्प राज्य सरकारने विकासकाकडून काढून घेत तो पुन्हा एकदा म्हाडाकडे सोपवला. (हेही वाचा, म्हाडाकडे अर्ज प्राप्त झालेल्या सर्व पात्र गिरणी कामगारांना उपलब्ध होणार घरे; लवकरच सदनिकांचा प्रत्यक्ष ताबा देण्यास सुरूवात)

विकासकाने अर्ध्यावरच सोडला प्रकल्प

गोरेगावमधील हा प्रकल्प सुरुवातीपासूनच वाद आणि चर्चेमध्ये राहिला. प्राप्त माहितीनुसार, विकासकाकडून म्हाडाच्या वाट्याला आलेल्या 306 सदनिकांसाठी विकासकाने काम सुरु केले. पण तो प्रकल्प त्याने मध्येच सोडला. शेवटी सरकारने हा प्रकल्प विकासकाकडून काढून घेतला आणि तो म्हाडाकडे सोपवला. आता म्हाडाचे मुंबई मंडळ रहिवाशांच्या 772 सदनिकांसह सोडतीसाठी घरे उपलब्ध करुन देण्यासाठी सन 2022 पासून काम करत आहे.

दरम्यान, म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी माहिती देताना सांगितले की, म्हाडाने या प्रकल्पातील आपल्या हिश्श्यांतील सुमारे 2500 घरे उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निवीदा काढण्याचे काम सुरु आहे. ही निविदा लवकरच प्रसिद्ध केली जाईल.

अल्प आणि अत्याल्प गटातील नागरिकांसाठी स्वस्ता घरे उपलब्ध करुन देणारी म्हाडा ही राज्यातील सर्वात जुनी संस्था आहे. सुरुवातीला ती "बाँम्बे हाऊसिंग बोर्ड" या नावाने ओळखली जात होती. मात्र पुढे विविध बाबींचा विचार करुन राज्य सरकारने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम 1976 अन्यव्ये महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणांची म्हणजेच "म्हाडा" ची 5 डिंसेबर 1977 रोजी स्थापना केली व निवारापूर्तीचे काम करणारी सर्व मंडळे म्हाडामध्ये विलीन करण्यात आली, असा उल्लेख म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर आढळतो.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)



Share Us