Fact Check: देशातील सर्व राज्यात शाळा-कॉलेज सुरु करण्यास गृहमंत्रालयाची परवानगी? व्हायरल होणाऱ्या या बातमीवर गृहमंत्रालयाचे स्पष्टीकरण, जाणून घ्या सत्य

लॉकडाऊन काळात देशातील शाळा-कॉलेजेस सुरु होणार असा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गृहमंत्रालयाने या फेक मेसेजचे खंडन केले असून सत्यही सर्वांसमोर मांडले आहे.

Fake TV news screengrab used to spread rumour | (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर असणाऱ्या लॉकडाऊन (Lockdown) काळात शाळा-कॉलेजेस पुन्हा सुरु होणार अशी बातमी सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत होती. ज्यात शैक्षणिक संस्था सुरु होणार असा दावा केला जात होता. परंतु, या सर्व निव्वळ अफवा असून त्यासाठी एडिटेड फोटो वापरण्यात आला आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. यात गृहमंत्रालयाने (Ministry of Home Affairs) सर्व राज्य सरकारला शैक्षणिक संस्था (Educational Institutions) सुरु करण्याची परवानगी दिली आहे, असे म्हटले आहे.

परंतु, गृहमंत्रालयाच्या सर्व प्रवक्तांनी या सर्व अफवांचे खंडन केले आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या लॉकडाऊनच्या नव्या नियमावलीनुसार, शैक्षणिक संस्था बंद राहणार आहेत. देशातील कोणत्याही राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात शैक्षणिक संस्था सुरु करण्यास अनुमती देण्यात आलेली नाही.

ही निव्वळ अफवा असून त्यासाठी न्यूज चॅनलचा एडिटेड स्क्रीनशॉर्ट वापरण्यात आला आहे. यात मीडिया कंपनीचा बनावट लोगो देखील दिसत आहे. यात स्क्रीनशॉर्टवर लिहिले आहे, "गृह मंत्रालयाने सर्व राज्यात शाळा पुन्हा सुरु करण्यास परवानगी दिली आहे." तसंच "सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवण्यात आले आहे," अशी माहिती या व्हायरल होणाऱ्या फोटोच्या टिकरवर दिसत आहे. (Maharashtra Lockdown 4 Guidelines: सार्वजनिक, खासगी वाहने Green And Orange Zones मध्ये सुरु, पाहा Containment Zones आणि इतर ठिकाणी काय सुरु काय बंद)

Fact Check by Home Ministry:

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा फोटो पूर्णपणे फेक आहे. गृहमंत्रालयाच्या प्रवक्तांनी सांगितले की, "देशातील सर्व शैक्षणिक संस्था पूर्णपणे सुरु करण्यास अद्याप मनाई आहे." कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन पूर्वीच देशातील सर्व शैक्षणिक संस्था बंद करण्यात आल्या. त्यानंतर टप्पाटप्प्याने लॉकडाऊन पूर्णपणे लावण्यात आला.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now