मेघालय येथील खाणीत अडकलेल्या 15 कामगारांपैकी एकाचा मृत्यू

त्यातील 15 खाण कामगारांपैकी एकाचा मृत्यू झाल्याचे आज वृत्त समोर आले आहे.

मेघालय बेकायदेशीर कोळसा खाण (फोटो सौजन्य- ANI)

मेघालय (Meghalaya) येथील बेकायदेशीर कोळसा खाणीत गेले 36 दिवस काही कामगार अडकलेले होते. त्यातील 15 खाण कामगारांपैकी एकाचा मृत्यू झाल्याचे आज वृत्त समोर आले आहे. तर नौदलाच्या जवानांकडून अडकलेल्या खाण कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

जयंतिसा हिल्य जिल्ह्यात बेकायदेशीरपणे कोळसा खाणीचे काम सुरु करण्यात आले होते. तर कोळशाची ही खाण 200 किमी खोल असून त्यामध्ये 15 कामगार काम करत होते. तसेच लियटीन नदीच्या बाजूलाच ही खाण आहे. 13 डिसेंबरच्या रात्री खाणीत भूस्खलन होऊन काम करणारे कामगार अडकले गेले.

या प्रकरणी एकाचा मृत्यू झाला असून इतर चौदा जणांचा ही मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर गेले 36 दिवसापासून नौदलाचे जवान आणि एनडीआरएफचे पाणबुडे रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.