Palghar Fire: बोईसर-तारापूर एमआयडीसीत अग्नीतांडव! 2 केमिकल कारखाने आगिच्या कचाट्यात (Watch Video)
यूके अरोमॅटिक अँड केमिकल कंपनीला लागलेल्या भीषण आगीने सालवड शिवाजी नगर परिसरातील 2 केमिकल युनिटलाही वेढले.
Palghar Fire: पालघर (Palghar) जिल्ह्यातील बोईसर-तारापूर एमआयडीसीमधील(Boisar Tarapur MIDC) एका रासायनिक कारखान्यात रविवारी आगीची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार अधिकाऱ्यांनी दिली. बोईसरच्या सालवड शिवाजी नगर परिसरातील कारखान्याला भीषण आग लागली. बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट नंबर के-6 मधील युके ॲरोमॅटिक अँड केमिकल्स या कारखान्याला भीषण आग लागली आहे. घटनेची माहितीमिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
आज रविवार असल्याने कारखान्यातील कामगारांना सुट्टी होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र ही आग कशामुळे लागली हे कारण अजूनह अस्पष्ट आहे. हा केमिकलचा कारखाना असल्यामुळे आग झपाट्याने पसरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही आग इतकी भीषण आहे की आगीचे आणि धुराचे लांबच लांब लोळ लांबूनही दिसताय. (Hingoli Shocker: हिंगोली हादरले! जवानाचा कुटुंबावर गोळीबार, पत्नी आणि मेहुण्याचा मृत्यू; अनेक जखमी)
आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून ऑपरेशन राबवले जात आहे. अद्याप कोणतीही दुर्घटना झाल्याची माहिती नाही. सुमारे दोन तासानंतरही आग आटोक्यात आली नाही. यात श्री केमिकल कंपनी देखील आगीच्या भक्षस्थानी आहे. दरम्यान, अग्निशमनदलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. सुदैवाने आगीनंतर कामगारांनी पळ काढल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.
आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरू. स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. शिवाजीनगर बाजूचा रस्ता दुरुस्तीसाठी खोदल्याने टँकर आणि इतर वाहनांनाही आग विझवणाऱ्या वाहनांसाठी अडथळा निर्माण केला आहे. यात परफ्युम आणि प्रेग्नेंसेस बनवणारा कारखाना होता. या कारखान्यामध्ये मोठा केमिकल साठा असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.