Massage Services at Candolim Beach: कँडोलिम बीचवर अनधिकृत मसाज सेवा; तीन महिलांवर गुन्हा दाखल
प्रशासनाने दिलेल्या अधिकृत निवेदनानुसार, सदर महिलांनी कायदेशीर परवानगी न घेताच समुद्रकिनाऱ्यावर मालिश सेवा अनधिकृतपणे पुरवली.
उत्तर गोवा येथील कँडोलिम बीच (Candolim Beach) परिसरात मसाज सेवा (Massage Services) दिल्याबद्दल तीन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशासनाने दिलेल्या अधिकृत निवेदनानुसार, सदर महिलांनी समुद्रकिनाऱ्यावर अनधिकृतपणे मालिश सेवा पुरवली. ही सेवा (Massage Services at Candolim Beach) उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांनी सक्षम प्राधिकरणाची कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नव्हती. परिणामी गोवा पोलिसांनी (Goa Police) या तिघींवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या तिन्ही महिलांची नावे समजू शकली नाहीत.
आरोपींना 25,000 रुपयांचा दंड
गोवा पोलीस माहिती देताना म्हणाले की, तीन महिला आरोपींना पणजी येथील पर्यटन उपसंचालकांसमोर हजर करण्यात आले. पोलिसांकडून या महिलांनी गोवा पर्यटन स्थळ संरक्षण आणि देखभाल कायदा 2001 च्या कलम 3 चे उल्लंघन केल्याबद्दल तपशीलवार अहवाल सादर करण्या आला. या अहवालावर गांभीर्याने विचार करुन पर्यटन उपसंचालकांनी तिन्ही आरोपींना प्रत्येकी 25,000 रुपये दंड ठोठावण्यात आला. मात्र, तिन्ही आरोपी दंड भरण्यात अयशस्वी ठरल्याने या तिघींविरोधातही गुन्हा नोंदविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. (हेही वाचा, AirAsia CEO Tony Fernandes यांचा व्यवस्थापन बैठकीत कपडे काढून Massage, सोशल मीडियावर ट्रोल)
अनधिकृत मसाज सेवेमुळे कायद्याचे उल्लंघन
तिन्ही महिला आरोपी ठोठावण्यात आलेला प्रत्येकी 25,000 रुपये दंड भरु शकल्या नसल्याची माहिती गोवा पोलिसांनी पर्यटन उपसंचालकांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर पर्यटन उपसंचालक कुलदीप आरोलकर यांनी फिर्याद दिल्याने कळंगुट पोलिसांना कारवाई करण्यास सांगितले. पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले की, पर्यटकांना अनधिकृतपणे मसाज सेवा देत असल्याचे आरोपी आढळून आले. ज्यामुळे कायद्याच्या अनेक कलमांचे उल्लंघन झाले. (हेही वाचा, Bhopal: अरे देवा! हनिमूनसाठी जायचं होतं गोव्याला, पण नवरा घेऊन गेला Ayodhya ला; परत येताच संतप्त पत्नीने मागितला घटस्फोट)
मसाजचा व्हिडिओ व्हायरल
दरम्यान, अलिकडेच कँडोलिम बीचवर अनधिकृत मसाजचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करुन वेळीच हस्तक्षेप केला. स्थानिकांच्या तक्रारींनंतर, गोवा सरकारने याआधी समुद्रकिनाऱ्यांवर बेकायदेशीर मसाज आणि इतर कृतिंमध्ये गुंतलेल्या दलाल आणि व्यक्तींना कारवाईचा इशारा दिला होता.
कँडोलिम बीच हा उत्तर गोवा येथील एक लांब, वालुकामय समुद्रकिनारा आहे. जो जलक्रीडा, सूर्यास्त आणि वैशिष्ट्यपूर्ण समुद्रकिनाऱ्यासाठी ओळखला जातो. हे ब्रिटीश पर्यटकांसाठी एक लोकप्रिय रिसॉर्ट ठिकाण देखील आहे. हा समुद्रकिनारा 2016 मध्ये भारतातील प्रमुख 25 समुद्रकिनाऱ्यांपैकी एक म्हणून निवडले गेला होता. कँडोलिम बीच हे अरबी समुद्र आणि इतर प्रसिद्ध समुद्रकिनारे असलेले 17व्या शतकातील पोर्तुगीज किल्ला फोर्ट अगुआडाजवळ आहे. जवळपास दुकाने, बार आणि रेस्टॉरंट्स देखील आहेत. नोव्हेंबर ते मार्च कँडोलिम बीचला भेट देण्याचा सर्वोत्तम कालावधी मानला जातो. या काळात उष्णकटिबंधीय हवामान अल्हाददायक असते. जे पर्यटकांना आकर्षित करुन घेते. जगभरातील अनेक पर्यटक या समुद्रकिनाऱ्याला भेट देतात.