नवीन UAPA कायद्यांतर्गत दहशतवाद्यांची यादी जाहीर; मसूद अझर, हाफिज सईद, दाऊद इब्राहिम आणि लखवी यांचा समावेश
मसूद अझर, हाफिज सईद, दाऊद इब्राहिम आणि झाकीर-उर-रहमान लखवी यांना दहशतवादविरोधी कायदा, यूएपीए कायद्यात सुधारित दहशतवादी घोषित केले गेले आहेत. भारत सरकारच्या वतीने राजपत्र जारी करून याची घोषणा केली गेली.
मसूद अझर (Masood Azhar), हाफिज सईद (Hafiz Saeed), दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) आणि झाकीर-उर-रहमान लखवी (Zaki-ur-Rehman Lakhvi) यांना दहशतवादविरोधी कायदा, यूएपीए कायद्यात सुधारित दहशतवादी घोषित केले गेले आहेत. भारत सरकारच्या वतीने राजपत्र जारी करून याची घोषणा केली गेली. अलीकडेच सरकारने यूएपीए कायद्यात सुधारणा केली होती. यानुसार दहशतवादी कारवायांमध्ये सामील होण्याच्या शक्यतेच्या आधारे कोणत्याही व्यक्तीला दहशतवादी घोषित केले जाऊ शकते. दरम्यान, या 4 दहशतवाद्यांविरूद्ध रेड कॉर्नर नोटीसही बजावण्यात आली आहे. जैश-ए-मोहम्मदचा नेता मसूद अझर याच्यावर भारतात पाच दहशतवादी हल्ले केल्याचा आरोप आहे. यावर्षी मे महिन्यात मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादीही घोषित करण्यात आले होते.
बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (यूएपीए) विधेयक केंद्रातील मोदी सरकारने 17 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात मंजूर केले. या विधेयकांतर्गत जे लोक दहशतवादी कारवायांमध्ये सामील आहेत किंवा कोणत्याही प्रकारे दहशतीला प्रोत्साहन देतात अशा लोकांचा समावेश या यादीत केला येऊ शकतो. यूएपीएच्या नवीन तरतुदीनुसार कोणालाही वैयक्तिकरित्याही दहशतवादी घोषित केले जाऊ शकते. यापूर्वी केवळ अतिरेकी संघटनांनाच दहशतवादी घोषित केले जाऊ शकत होते. आता त्यांचे नाव या यादीमध्ये आल्यानंतर या दहशतवाद्यांचादेखील या यादीमध्ये वैयक्तिकरित्या समावेश केला जाईल.
या यादीमध्ये आगामी काळात आणखीन अनेक कुख्यात नावे देखील जोडली जातील. अंडरवर्ल्ड डॉनदाऊद इब्राहिम याच्यावर मुंबई दहशतवादी हल्ला केल्याचा आरोप आहे. तर, 2001 च्या भारतीय संसदेवरील हल्ला आणि या वर्षाच्या सुरुवातीस पुलवामा दहशतवादी हल्ल्यामागील अझरच्या नेतृत्वात जैशचा हात होता, यात 40 जवान शहीद झाले होते. संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाने त्याला 1 मे 2019 रोजी आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून सूचीबद्ध केले होते. 1994 मध्ये काश्मिरच्या अनंतनागमधून अटक झालेल्या अझरला डिसेंबर 1999 मध्ये इंडियन एअरलाइन्सच्या आयसी 814 च्या अपहरणकर्त्यांनी मुक्त करण्याच्या अटीनंतर त्याची सुटका करण्यात आली होती.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)