Market Falls Today: सेन्सेक्स 115.81 अंकांनी घसरून 66,166.93 वर स्थिरावला; निफ्टीमध्येही 19.30 अंकांची घसरण

सलग घसरणीचा हा तीसरा दिवस होता. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज सेन्सेक्स (Sensex ) 115.81 अंकांनी घसरून 66,166.93 वर स्थिरावला तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंज निफ्टीमध्येही (Nifty ) 19.30 अंकांची घासरण होऊन तो 19,731.75 वर स्थिरावला.

Stock Market (Archived images)

पाठिमागील काही दिवसांपासून सतत चढा राहिलेला आणि ऐतिहासीक कामगिरी करणाऱ्या भारतीय शेअर बाजारात आज मोठी घसरण पाहायला मिळाली. सलग घसरणीचा हा तीसरा दिवस होता. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज सेन्सेक्स (Sensex ) 115.81 अंकांनी घसरून 66,166.93 वर स्थिरावला तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंज निफ्टीमध्येही (Nifty ) 19.30 अंकांची घासरण होऊन तो 19,731.75 वर स्थिरावला. सेन्सेक्स आणि निफ्टी-फिप्टीमध्ये बऱ्यापैकी घसरण पाहायला मिळाली असली तरी, लघू आणि मध्यम आकारांच्या कंपन्यांनी मात्र चांगली कामगिरी केल्याचेही पाहायला मिळाले.

आज दिवसभरात निफ्टी मेटल, निफ्टी कन्झ्युमर ड्युरेबल्स आणि निफ्टी ऑटो हे क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये सर्वाधिक वाढल्याचे पाहायला मिळाले. त्याच्या दुसऱ्या बाजूला फायनान्शिअल सर्व्हिसेस यांसारख्या हेवीवेट निर्देशांकात किरकोळ घट झाल्याचे पाहायला मिळाले.दिवसभरातील वाढिच्या कंपन्यांवर लक्ष दिले तर निफ्टी मेटल, निफ्टी कन्झ्युमर ड्युरेबल्स आणि निफ्टी ऑटो हे क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये सर्वाधिक वाढल्याचे पाहायला मिळाले. त्याच्या उलट तर निफ्टी बँक आणि निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस यांसारख्या निर्देशांकात किरकोळ घट झाली.

निफ्टी 50 मध्ये आज हिरो मोटोकॉर्प, जेएसडब्लू स्टील, टाटा स्टील, एलटीआयएम आणि यूपीएल हे सर्वाधिक लाभधारक होते. तर, Divi's Laboratories, Nestle India, TCS, IndusInd Bank आणि Adani Ports या कंपन्यांचे समभाग मोठ्या प्रमाणावर पडले.

भारतीय शेअर बाजाराचे अभ्यासक सांगतात की, इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यातील युद्धामुळे आधीच कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. सोबतच मध्य पूर्वेतील चालू संघर्षाच्या दरम्यान हमाससोबत सुरु असलेल्या इस्त्राईलच्या युद्धामुळे कच्चा तेलाच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. त्याचा शेअर बाजाराव मोठा परिणाम झाला. टीसीएस (-1.40%), एचडीएफसी बँक (-0.24%) आणि रिलायन्स (-0.15%) सारख्या ब्लू-चिप समभागांच्या घसरणीमुळे शेअर बाजाराला मोठा धक्का बसला. डेल्टा कॉर्प लिमिटेडच्या एका उपकंपनीला जीएसटी विभागाची नोटीस मिळाल्यानंतर त्यांचे शेअरही 8% हून अधिक घसरले.

एक्स पोस्ट

शेअर बाजारातील घसरण या आधिच्या आठवड्यात शेटच्या दिवशीही अशीच राहिली होती. याआधी शुक्रवारी बीएसई बेंचमार्क 125.65 अंकांनी म्हणजे 0.19 टक्क्यांनी घसरून 66,282.74 वर स्थिरावला होता. NSE चा निफ्टी 42.95 अंकांनी म्हणजेच 0.22 टक्क्यांनी घसरून 19,751.05 वर आला होता. पाठिमागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार नेहमीच वधारलेला पाहायला मिळत होते. मात्र, पाठिमागच्या काही दिवसांपासून त्यात मोठी घसरण झाल्याचेही पाहायला मिळाले. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमच्या अधिन असते.