कुत्र्याच्या पिल्लावर बलात्कार; CCTV फुटेज मिळूनही पोलिसांची साक्षीदार महिलेकडे घटनेबाबत सविस्तर माहितीची मागणी

आरोपिविरुद्ध काय कारवाई करता येऊ शकेल याबाबत पोलीस विचार करत आहेत. दरम्यान, या प्रकाराबाबत आपण पोलिसांना माहिती दिली तेव्हा सातत्याने आपल्याला घटनेबाबत सविस्तर माहिती देण्यास सांगण्यात येत होते. अखेर या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देण्यात आले. तरीसुद्धा हे फुटेज अगदीच अस्पष्ट असल्याचे सांगत पोलीस घटनेबाबत सविस्तर माहिती विचारत होते, असा आरोप महिलेने केला आहे.

Man rapes newly born puppies in Chennai | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

चेन्नई (Chennai) येथे एक कुत्र्याचे पिल्लू (puppie) विकृत व्यक्तिच्या वासनेचा बळी ठरले. एका विकृत व्यक्तिने चक्क कुत्र्याच्या पिल्लावर बलात्कार (Man rapes newly born puppies) केला. एका सजग महिलेच्या सतर्कतेमुळे प्रकरणाचा भांडाफोड झाला. आरोपीविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. आपण या घटनेचे साक्षीदार असल्याचे सांगत संबंधित महिलेने या प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना दिले आहे.

आलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. आरोपिविरुद्ध काय कारवाई करता येऊ शकेल याबाबत पोलीस विचार करत आहेत. दरम्यान, या प्रकाराबाबत आपण पोलिसांना माहिती दिली तेव्हा सातत्याने आपल्याला घटनेबाबत सविस्तर माहिती देण्यास सांगण्यात येत होते. अनेकदा माहिती देऊनही घटनेबाबत सविस्त विचारले जात होते. अखेर या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देण्यात आले. तरीसुद्धा हे फुटेज अगदीच अस्पष्ट असल्याचे सांगत पोलीस घटनेबाबत सविस्तर माहिती विचारत होते, असा आरोप महिलेने केला आहे. (हेही वाचा, विकृती: अपहरण करुन शेजाऱ्याच्या गर्भवती शेळीवर रात्रभर बलात्कार! प्रकृती गंभीर, नराधमाला अटक)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर महिलेने हा प्रकार गुरुवारी पाहीला. त्यानंतर गुरुवारी लगेचच पोलिसांत तक्रार दिली. तक्रारदार महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपीने कुत्र्याच्या पीडित पिल्लाला उचलून घेतले. सुरुवातीला आरोपीचा पिल्लाला उचलून घेऊन आश्रय देण्याचा इरादा असावा असे आपल्याला जाणवले. मात्र, पिल्लासोबत चाळे करता करता आरोपीने पँटची चेन अचानक काढली आणि पिल्लावर लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून आपल्याला संताप आला. आपण आरोपीला पकडण्यासाठी घटनास्थळी गेलो. मात्र, तोपर्यंत आरोपीने तेथून पळ काढल्याचे महिलेने म्हटले आहे.

Man rapes newly born puppies in Chennai | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

पीडित पिल्लाचा जन्म हा आपल्या घराजवळच झाला आहे. आपणच त्याची काळजी घेतो असेही तक्रारदार महिलेने म्हटले आहे. आलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. आरोपिविरुद्ध काय कारवाई करता येऊ शकेल याबाबत पोलीस विचार करत आहेत.



संबंधित बातम्या