Rekha Gupta Death Threat: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक; चौकशीदरम्यान झाला मोठा खुलासा
उत्तर पश्चिम जिल्ह्याच्या विशेष कर्मचाऱ्यांच्या पथकाने गाझियाबाद येथून आरोपीला पकडले आहे. आरोपीने दारू पिऊन रेखा गुप्ता यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.
Rekha Gupta Death Threat: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता (Rekha Gupta) यांना जीवे मारण्याची धमकी (Death Threat) देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) उत्तर पश्चिम जिल्ह्याच्या विशेष कर्मचाऱ्यांच्या पथकाने गाझियाबाद येथून आरोपीला पकडले आहे. आरोपीने दारू पिऊन रेखा गुप्ता यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. मुख्यमंत्र्यांना धमकी देण्यासाठी फोन करण्यापूर्वी, आरोपीने आणखी एक फोन केला होता, ज्यामध्ये त्याने त्याच्या पत्नीशी बोलण्यास सांगितले होते.
शुक्रवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास गाझियाबाद पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून आरोपीने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना मारण्याची धमकी दिली होती. वृत्तानुसार, आरोपी कायद्याचा पदवीधर असून त्याने मद्यपान करून ही धमकी दिली होती. पत्नी गेल्यानंतर तो वैयक्तिक कारणांमुळे नाराज होता. धमकी देण्यापूर्वी त्याने त्याच्या पत्नीशी बोलण्यासाठी फोनही केला. पोलिसांनी त्याच्याकडून बनावट ओळखपत्रही जप्त केले आहे. (हेही वाचा - Delhi CM Rekha Gupta Death Threat: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसाकडून चौकशी सुरू)
दरम्यान, शुक्रवारी गाझियाबाद पोलिसांचे एसपी कोतवाली रितेश त्रिपाठी यांनी सांगितले की, गुरुवारी रात्री उशिरा गाझियाबाद पोलिसांना यूपी 112 वर फोन आला होता, ज्यामध्ये फोन करणाऱ्याने सांगितले होते की दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना मारले जाईल. याप्रकरणी तात्काळ कारवाई करत दिल्ली पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिस दलाने तपास सुरू केला होता.
रेखा गुप्ता यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्याच आली आहे. वायव्य दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा आणखी कडक करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना अलिकडेच मिळालेल्या ईमेल धमकीनंतर पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना 'झेड' श्रेणीची सुरक्षा प्रदान केली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jun 07, 2025 01:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

