Punjab Shocker: गर्भवती पत्नीला पलंगाला दोरीने बांधले, जिवंत जाळले; कौटुंबीक वादातून कृत्य
धक्कादायक म्हणजे पीडित महिला गर्भवती (Pregnant Woman) होती. महिलेच्या हत्येला पीडितेचा पतीच जबाबदार असल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे.
घरगुती वादामुळे टोकाचे पाऊल उचलत एका व्यक्तीने आपल्या पत्नीला घरातील पलंगाला दोरीने बांधून तिला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे पीडित महिला गर्भवती (Pregnant Woman) होती. महिलेच्या हत्येला पीडितेचा पतीच जबाबदार असल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. पंजाब (Punjab) राज्यातील रय्या परिसरातील बुलेद नांगल गावच्या हद्दीमध्ये हा अमानवी प्रकार शुक्रवारी (19 एप्रिल) रोजी घडला. पीडित आणि आरोपी पतीपत्नी आहेत. परिसरात हे जोडपे एमकेकांसोबतच्या भांडणामुळे बरेच चर्चेत होते, अशी माहिती पोलिसांनी प्राथमिक तपासाच्या आधारावर दिली आहे.
पोलसांनी काही स्थानिक नागरिकांकडे केलेल्या चौकसीनुसार हे जोडपे सुरुवातीपासूनच भांडखोर होते. पती आणि पत्नी सातत्याने एकमेकांशी भांडत असत. ही घटना घडली त्या दिवशी सकाळीही (शुक्रवार) पती पत्नीमध्ये कडाक्याचा वाद झाला. वादाचे स्वरुप नेहमीप्रमाणे असले तरी त्याची तीव्रता अधिक होती. भांडणामुळे संतापलेल्या आणि पती सुखदेव याने पत्नी पिंकी हिच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. शब्दाने शब्द वाढत गेला आणि दोघांमध्ये झटापट झाली. त्यातच पती सुखदेवने पिंकी हीला घरातील पलंगावर दोरीने करकचून बांधले आणि पलंगाला आग लावून दिली. ज्यामुध्ये ती जिवंत जळाली. गर्भवती असलेल्या पिंकीचा भाजल्यामुळे मृत्यू झाला. (हेही वाचा, Nagpur Crime: चुलत भावाकडून लैंगिक अत्याचार, बहीण गर्भवती; वाढदिवसाचा केक कापल्यावर क्रूर कृत्य)
इन्स्पेक्टर गुरविंदर सिंग यांनी या भीषण घटनेबापत माहिती देताना सांगितले की, पत्नी पिंकी गर्भवती होती. तिच्या पोटात दोन जुळी अर्भके वाढत होती. या घटनेत पिंकीचा आणि तिच्या पोटातील अर्भकांचा जळून मृत्यू झाला. हे कृत्य करणारा आरोपी सुखदेवसिंग फरार आहे. पोलीस त्याच्या मागावर आहेत. मात्र, अद्यापपर्यंत तरी त्याचा ठावठिकाणा सापडू शकला नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.