Navi Mumbai Crime: प्रेम प्रस्ताव धुडकावला, मैत्रिणीसोबत हसत असल्याच्या रागात तरुणीची लोखंडी रॉडने मारहाण; आरोपी अटकेत
प्रेम प्रस्ताव धुडकावून मैत्रिणीसोबत हसत असल्याच्या रागात एकाने तरुणीची लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरोपी पोलिसांच्या अटकेत आहे. प्रेम प्रस्तावाची खिल्ली उडवल्याच्या संशयामुळे हे कृत्य केल्याचं आरोपीने म्हटलं आहे.
Navi Mumbai Crime: प्रेम प्रस्ताव नाकारल्याच्या रागात तरुणीची लोखंडी रॉडने मारहाण (Woman Assaulted With Iron Rod) केल्याची घटना नवी मुंबईतून समोर आली आहे. या प्रकरणी आरोपी सध्या पोलिसांच्या अटकेत आहे. 27 जुलै रोजी नवी मुंबईतील न्हावा गावात (Nhava village)ही घटना घडली. तरुणी तिच्या मैत्रिणींसोबत हसत होती त्यावरून म्हात्रे यांनी आपली चेष्टा करत असल्याचे समजले. यानंतर त्याने शेजारी पडलेला लोखंडी रॉड उचलून महिलेच्या डोक्यात वार केला. पोलिसांनी सांगितले की, मारहाणीमुळे पीडिता रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, मात्र सध्या तिची पिकृती स्थिर आहे. प्रीतम म्हात्रे (31) असे आरोपीचे नाव आहे. (हेही वाचा:Sudden Death of Thane Man: भांडणानंतर हृदयविकाराचा झटका; तरुण उभ्या उभ्याच कोसळला; शिवसेना नेत्याच्या मुलाचा मृत्यू (Watch Video) )
हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, लोखंडी रॉडने मारहाण झाल्यानंतर पीडितेच्या डोक्याला सहा टाके पडले आहेत. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. आरोपी हा न्हावा गावात पीडिता राहते. त्याच भागात राहतो. म्हात्रे हा ट्रेलर चालवतो. दोन वर्षांपूर्वी म्हात्रे याने तरुणीला आपले प्रेम असल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर तरुणीने त्याचा प्रस्ताव नाकारला आणि त्यानंतर पीडितेने त्याच्यापासून दूरावा ठेवला. शनिवारी तरुणी तिची एक मौत्रिण माणिक टोक येथे गेले होते. म्हात्रेही त्याच ठिकाणी हजर राहून तिच्यावर नजर ठेवत होता. (हेही वाचा:Uttar Pradesh Crime: लज्जास्पद! उत्तर प्रदेशमधील बरेली येथे 85 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार, पीडितेचा मृत्यू)
यादरम्यान ती तरुणी तिच्या मैत्रिणींसोबत एका विनोदावर हसत होती. त्यावर, म्हात्रे याने आपली चेष्टा करत असल्याचे समजले आणि शेजारी पडलेला लोखंडी रॉड उचलून महिलेच्या डोक्यात वार केला. पोलिसांनी सांगितले की, मारहाणीमुळे पीडिता रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलम 109 (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jul 30, 2024 10:33 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

