मल्याळी व्लॉगर Muhammed Yaseen चा अफगाणिस्तानमध्ये प्रवास; तालिबानच्या शस्त्रास्त्रांचा परिचय, कट्टर इस्लामिक राजवटीची प्रशंसा (Watch Video)

या व्हिडिओमध्ये तो तालिबानी लोकांची शस्त्रे म्हणजेच गन्स दाखवत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर मोहम्मद यासीनवर टीका व्हायला सुरुवात झाली आहे.

Muhammed Yaseen (संग्रहित संपादित प्रतिमा)

अफगाणिस्तान (Afghanistan) हा देश गेल्या 4 दशकांपासून युद्धाच्या स्थितीत आहे. अनेक देशांनी त्यावर हल्ले केले आहेत, ज्यात लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशात 2021 मध्ये तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला व त्यानंतर तेथील परिस्थिती आणखी बिकट झाली. देशातील लोक मोठ्या दडपणाखाली, भीतीखाली जगत आहे. नागरिकांवर अनेक निर्बंध आहेत. त्यांचे स्वातंत्र्य जवळजवळ हिरावून घेतले आहे. अशात अफगाणिस्तानमध्ये प्रवास करण्याची कल्पनाही करवत नाही. मात्र नुकतेच मोहम्मद यासीन (Muhammed Yaseen) नावाच्या मल्याळी व्लॉगरने अफगाणिस्तान येथे प्रवास केला.

इतकेच नाही तर मोहम्मद यासीनने तालिबानचे कौतुक करणारा व्हिडिओही अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये तो तालिबानी लोकांची शस्त्रे म्हणजेच गन्स दाखवत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर मोहम्मद यासीनवर टीका व्हायला सुरुवात झाली आहे.

जागतिक स्तरावर अफगाणिस्तानमधील तालिबान राजवटीला पाठिंबा देण्याकडे फार कमी लोकांचा कल आहे. या देशातील मूलतत्त्ववादी इस्लामिक सरकार सामान्यत: त्यांच्या भयानक आणि अपारंपरिक कृतींद्वारे चर्चेचा विषय ठरत आहे. अफगाणिस्तानमध्ये सत्तेवर आल्यापासून, तालिबानने केवळ महिलांना शिक्षण आणि नोकरी करण्यापासून प्रतिबंधित केले. त्यांचे व्यक्तीस्वातंत्र्य हिरावून घेतले. या परिस्थितीत, मोहम्मद यासीन हा भारतीय नागरिक तालिबान राजवटीची, त्यांचे कथित आदरातिथ्य आणि मैत्रीबद्दल प्रशंसा करताना दिसत आहे. (हेही वाचा: Nawaz Sharif Driver Spit On Woman: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या ड्रायव्हरचे घृणास्पद कृत्य, प्रश्न विचारणाऱ्या महिलेच्या चेहऱ्यावर थुंकला)

मुहम्मद यासीन एक मल्याळी युट्यूबर आहे. त्यांचे सोशल मीडियावर तालिबानची प्रशंसा करत त्यांची शस्त्रे दाखवणारा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ तयार करण्यासाठी यासीनने तालिबानच्या ताब्यात असलेल्या अफगाणिस्तानमध्ये प्रवास केला. व्हिडिओमध्ये, तो तालिबानने वापरलेल्या रणनीतीचे स्वागत करताना दिसत आहे. यासीनने याआधीही त्याच्या चॅनलवर अनेक व्हिडिओ पोस्ट केले आहेत, जिथे तो अतिरेकी इस्लामी राजवटीचे कौतुक करताना दिसतो.