Air India Plane Crash: अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या अपघातानंतर टाटा मोटर्ससह टाटा समूहाच्या 'या' प्रमुख शेअर्समध्ये मोठी घसरण

टाटा ग्रुपची एअरलाइन कंपनी एअर इंडियासोबत झालेल्या या अपघातानंतर शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या इतर प्रमुख टाटा कंपन्यांच्या शेअर्सवरही मोठा परिणाम दिसून आला.

Air India Plane Crash: अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या अपघातानंतर टाटा मोटर्ससह टाटा समूहाच्या 'या' प्रमुख शेअर्समध्ये मोठी घसरण
Indian Stock Market Crash | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Air India Plane Crash: आज दुपारी गुजरातमधील अहमदाबाद येथे एक मोठा विमान अपघात झाला. अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान दुपारी 1.10 वाजता उड्डाणानंतर काही मिनिटांतच कोसळले (Air India Plane Crash). टाटा ग्रुपची एअरलाइन कंपनी एअर इंडियासोबत झालेल्या या अपघातानंतर शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या इतर प्रमुख टाटा कंपन्यांच्या शेअर्सवरही (Tata Group stocks Crash) मोठा परिणाम दिसून आला. विमान अपघातानंतर टाटा समूहाच्या प्रमुख कंपन्या टाटा मोटर्स, टायटन, टाटा स्टील आणि टीसीएसच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली.

विमान कंपन्यांचे शेअर्सही कोसळले -

गुरुवारी दुपारी टाटा मोटर्सचे शेअर्स 2.75 टक्क्यांनी घसरून 716.00 रुपयांवर आले. तर टायटनचे शेअर्स 2.39 टक्क्यांनी घसरून 3456.00 रुपयांवर, टाटा स्टीलचे शेअर्स 2.17 टक्क्यांनी घसरून 152.95 रुपयांवर आणि टीसीएसचे शेअर्स 1.11 टक्क्यांनी घसरून 3433.50 रुपयांवर व्यवहार करत होते. याशिवाय, देशातील आघाडीची विमान कंपनी इंडिगो (इंटरग्लोब एव्हिएशन) चे शेअर्स 2.36 टक्क्यांनी घसरून 5499.50 रुपयांवर व्यवहार करत होते. तसेच अपघातानंतर स्पाइसजेटचे शेअर्स 1.06 टक्क्यांनी घसरले. (हेही वाचा - Air India Plane Crash: अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान कसे कोसळले? समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ)

दरम्यान, आज एअर इंडियाचे विमान अहमदाबादमध्ये कोसळले. या विमानात बिझनेस क्लास आणि इकॉनॉमी क्लासमध्ये एकूण 254 ते 267 जागा आहेत. दुपारी 1.10 वाजता अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर, हे विमान सुमारे 9 तासांच्या प्रवासानंतर सकाळी 10.45 वाजता लंडनच्या गॅटविक विमानतळावर उतरणार होते. (हेही वाचा - Vijay Rupani: एअर इंडियाच्या AI171 विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी प्रवासी असल्याचे वृत्त)

प्राप्त माहितीनुसार, एअर इंडियाच्या या अपघातग्रस्त विमानात एकूण 242 लोक होते, ज्यात 12 क्रू मेंबर्स आणि 230 प्रवाशांचा समावेश आहे. एवढेच नाही तर गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील अपघातग्रस्त विमानातून प्रवास करत असल्याच्या बातम्या अनेक माध्यमांनी दिल्या आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Jun 12, 2025 05:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).