Mahindra Potato Planting Machinery: शेतकऱ्यांना दिलासा; महिंद्राने तीन राज्यांत सादर केले बटाटा लागवडीसाठी नवीन मशीन PlantingMaster Potato +, 25 टक्क्यांनी वाढेल उत्पादन

महिंद्र अँड महिंद्राने निवेदनात म्हटले आहे की

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credits: PTI)

महिंद्र अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) कंपनीने मंगळवारी माहिती दिली की,   त्यांनी काही राज्यांत बटाटा (Potato) लागवडीसाठी नवीन उपकरण (Machinery) बाजारात आणले आहे. महिंद्र अँड महिंद्राने निवेदनात म्हटले आहे की, कंपनीच्या फार्म इक्विपमेंट सेक्टरने (FEC) देशात नवीन बटाटा पेरणीची यंत्रणा सुरू केली आहे. प्लांटिंगमास्टर बटाटा + (PlantingMaster Potato +) ही मशीनरी कंपनीच्या युरोपमधील भागीदार ड्यूल्फच्या (Dewulf) सहयोगाने तयार केली गेली आहे. महिंद्र आणि ड्यूल्फ यांनी बटाटा पेरणीची नवीन तंतोतंत तंत्रज्ञान ओळखण्यासाठी मागील वर्षी पंजाबमधील पुरोगामी शेतकर्‍यांशी भागीदारी केली. या शेतकर्‍यांनी या यंत्रणेचा वापर सुरू केल्यानंतर पारंपारिक पद्धती पेक्षा या नवीन उत्पादनात 20-25 टक्के वाढझाल्याचे दिसून आले.

एम अँड एम एफईएसचे अध्यक्ष हेमंत सिक्का म्हणाले, ‘जगातील बटाटा उत्पादक म्हणून दुसर्‍या क्रमांकाचा देश असलेल्या भारतात याचे उत्पादन वाढविणे आणि कृषी अवजारे सुधारित करणे आवश्यक आहे. बटाटा लागवडीतील उत्पादकता गुणवत्ता सुधारण्यासाठी आम्ही प्लांटिंगमास्टर बटाटा + हे तंत्रज्ञान भारतीय शेतकऱ्यांसमोर आणत आहोत. ही उपकरणे काही बाजारपेठेत भाड्याच्या आधारावरही उपलब्ध आहेत. भारतीय शेतकर्‍यांना हे नवे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यामुळे खरेदीसाठी सुलभ वित्तपुरवठा करून देण्यात आले आहे.’ (हेही वाचा: लॉक डाऊनमध्ये घर बसल्या ऑनलाईन विकत घेऊ शकणार महिंद्रा अँड महिंद्राच्या गाड्या; कंपनीने सादर केला Online platform)

भारत जगातील बटाटा उत्पादनात दुसर्‍या क्रमांकाचा देश आहे, परंतु उत्पादनात तो देश मागे आहे. भारतात दर एकरी उत्पादन 8.5 टन आहे, तर न्यूझीलंडमध्ये एकरी 17 टन उत्पादन आहे. बरेच घटक पीक उत्पादनाची पातळी निश्चित करतात आणि योग्य कृषी यंत्रसामग्रीचा वापर हा एक महत्त्वाचा घटक आहे. कंपनीने म्हटले आहे की, नवीन प्लांटिंगमास्टर बटाटा + पंजाबमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल, तर हे यंत्र उत्तर प्रदेशात विक्री आणि भाड्याने आणि गुजरातमध्ये महिंद्रा रेंटल एंटरप्राइझ नेटवर्कद्वारे भाड्याने उपलब्ध होईल.