Maharashtra Rain: आज राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा; रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला यलो अलर्ट
जुलै महिन्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. गेल्या महिन्यात महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मोसमी पावसाचा लपंडाव पाहायला मिळाला.
राज्याच्या वेगवेगळ्या भागात पावसाने चांगलीच हजेरी (Rain) लावल्याचे पाहायला मिळत आहे. कुठं जोरदार पाऊस होतोय, तर कुठं मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस होत आहे. ज्या भागात चांगला पाऊस झालाय, त्या भागात शेतीच्या कामांना वेग आला आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार आजही राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज राज्यातील कोकणसह संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आद कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसऱ्या बाजुला आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (हेही वाचा - Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा, 6 जुलैपासून पुन्हा जोर वाढणार )
जुलै महिन्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. गेल्या महिन्यात महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मोसमी पावसाचा लपंडाव पाहायला मिळाला. राज्यातील कोकण आणि घाटमाथा या भागात निश्चितच चांगला जोरदार पाऊस झाला. परंतु उर्वरित भागांमध्ये पावसाचे प्रमाण हे खूपच कमी होते. दक्षिण भारताचा अपवाद वगळता राज्यातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये जून महिन्यात पावसाचे प्रमाण कमी पाहायला मिळाले. जून महिन्यात देशातील बहुतांशी भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला.
देशातील बहुतांशी भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनसार, जुलै महिन्यात महाराष्ट्र सहित संपूर्ण देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार आहे. जुलै महिन्यात सरासरीच्या 106 टक्के एवढा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसेच या जुलै महिन्यात राज्यातील कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये चांगल्या जोरदार पावसाची शक्यता आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jul 03, 2024 10:05 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

