Maharashtra Monsoon: राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून विदर्भासह कोकणाला विशेष सुचना

गेले काही दिवसात पावसाने उसंत घेतली असली तरी वरुण राजा पुन्हा एकदा राज्यात दमदार हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Heavy Rain | (Photo Credit - Twitter/ANI)

राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून (Weather Forecasting) देण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात विदर्भासह (Vidarbha) राज्यातील विविध भागात पावसाची जोरदार बॅटींग बघायला मिळाली. विदर्भात तर महापूर सदृश स्थिती निर्माण झाली होती. गेले काही दिवसात पावसाने उसंत घेतली असली तरी वरुण राजा पुन्हा एकदा राज्यात दमदार हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. तसेच कोकणात देखील पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. मध्य महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्र (Western Maharashtra), कोकण (Konkan) आणि विदर्भाला हवामान विभागकडून विशेष सुचना देण्यात आल्या आहेत.

 

गेल्या आठवड्यात विदर्भात (Vidarbha) पावसाचा अतीवृष्टी सदृश्य पाऊस कोसळला. विदर्भातील विविध जिल्ह्यांना महापुराचा फटका बसला. विदर्भात सरासरीपेक्षा 180 टक्के अधिक पावसाची नोंद झाली. वर्धा (Wardha), अमरावती (Amravati), चंद्रपूर (Chandrapur), गडचिरोली (Gadchiroli), बुलडाणा (Buldhana), यवतमाळ (Yavatmal), भंडारा (Bhandara) या जिल्ह्यांमध्ये महापूराची स्थिती निर्माण झाली होती. तरी पुन्हा एकदा पुढील तीन दिवस विजांज्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. महापूराच्या पार्श्वभुमिवर  मदत आणि बचावकार्यासाठी एनडीआरएफ (NDRF) आणि एसडीआरएफच्या (SDRF) तुकड्या विदर्भात दाखल झाल्या आहेत. (हे ही वाचा:-Mumbai: मुंबईला दोन वर्षात खड्डे मुक्त करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)

 

तसेच सध्या कोकणातील विविध भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. तरी प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सुचना देण्यात आल्या आहेत. मुंबईसह उपनगरातही आज सकाळपासून पावसाची रीपरीप बघायला मिळत आहे. तसेच मध्य महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रातही  पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यभरातील हवामानाचा अंदाज घेता प्रशासन सज्ज आहे तरी नागरिकांना खबरदारी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.