महाराणा प्रताप यांचे वंशज Arvind Singh Mewar यांचे निधन; Udaipur च्या City Palace मध्ये घेतला अखेरचा श्वास
Arvind Singh Mewar हे HRH group of hotels चे ते अध्यक्ष होते. रविवारी राजस्थानमधील उदयपूर येथे दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले.
राजपूत किंग महाराणा प्रताप यांचे वंशज Arvind Singh Mewar यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले आहे. Arvind Singh Mewar हे HRH group of hotels चे ते अध्यक्ष होते. रविवारी राजस्थानमधील उदयपूर येथे दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले.मेवाडच्या पूर्वीच्या राजघराण्यातील 81 वर्षीय Arvind Singh Mewar यांच्यावर उदयपूरच्या सिटी पॅलेसमधील त्यांच्या निवासस्थानी उपचार सुरू होते.
अरविंद यांच्या पश्चात पत्नी विजयराज कुमारी, मुलगा लक्ष्यराज सिंह मेवाड आणि मुली भार्गवी कुमारी मेवाड आणि पद्मजा कुमारी परमार असा परिवार आहे. त्यांचे अंत्यसंस्कार सोमवारी (17 मार्च) होणार आहेत, असे सांगण्यात आले आहे. त्यांच्या निधनामुळे उदयपूर सिटी पॅलेस रविवार आणि सोमवार दोन्ही दिवशी पर्यटकांसाठी बंद राहणार आहे.
Arvind Singh Mewar कोण होते?
Arvind Singh Mewar हे Bhagwant Singh Mewar आणि Sushila Kumar यांचे सर्वात लहान चिरंजीव होते. त्यांचा एक मोठा भाऊ महेंद्रसिंग मेवार होता, ज्यांचे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये निधन झाले. अरविंद यांचे शिक्षण अजमेरच्या प्रतिष्ठित Mayo College मध्ये झाले. जिथे त्यांना क्रिकेट आणि पोलोचीही आवड निर्माण झाली.
शालेय शिक्षणानंतर, अरविंद उदयपूरला परतले आणि त्यांचे आजोबा महाराणा भूपाल सिंहजी यांच्या नावावर असलेल्या महाराणा भूपाल महाविद्यालयात इंग्रजी साहित्य, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्राचा अभ्यास करत कला शाखेची पदवी (बीए) पूर्ण केली.
अरविंद यांनी डिसेंबर 1961 मध्ये भोपाळ नोबल्स कॉलेजच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या विदर्भाविरुद्धच्या सामन्यात रणजी ट्रॉफी स्पर्धेत पदार्पण केले. 1960 आणि 1970 च्या दशकात त्यांची सक्रिय क्रिकेट कारकीर्द होती. पुढे, त्यांनी युनायटेड किंग्डममधील Albans येथील Metropolitan College मध्ये व्यवसाय अभ्यासक्रम घेतला. त्यानंतर अमेरिकेत हॉटेल व्यवस्थापनाचा अभ्यास केला.पोलोवरील त्यांचे प्रेम त्यांना युकेपर्यंत घेऊन गेले, जिथे त्यांनी केंब्रिज आणि न्यूमार्केट पोलो क्लबमध्ये 'द उदयपूर कप' सुरु केला.
अनेक वर्षे, अरविंद सिंग मेवार शिकागोमध्ये राहिले आणि काम केले, त्यांनी hospitality industry चा अनुभव मिळवला आणि first-class international hotels कशी चालवली जातात याची त्यांना ओळख झाली.या सर्व अनुभवांमुळे त्यांना एचआरएच हॉटेल्स ग्रुपचे नेतृत्व करता आले.
कौटुंबिक वाद
1984 मध्ये अरविंदचे वडील भगवंत सिंग मेवार यांचे निधन झाल्यानंतर, घर आणि मालमत्तेच्या वादांच्या नेतृत्वावरून त्यांच्या कुटुंबात संघर्ष सुरू झाला.भगवंत सिंह यांच्या मृत्युनंतर, अरविंद यांना घराच्या नेतृत्वाची भूमिका स्वीकारावी लागली. त्याच वेळी, त्यांचा मोठा भाऊ महेंद्र याला कुटुंबाचा प्रमुख म्हणून राज्याभिषेक करण्यात आला. गेल्या वर्षी महेंद्र यांच्या निधनानंतर, त्यांचा मुलगा विश्वराज सिंह मेवार, जो भाजप आमदार देखील आहे, त्याला कुटुंबाचा प्रमुख बनवण्यात आले. त्यानंतर विश्वराज यांना त्यांच्या चुलत भावाने, अरविंद यांचा मुलगा लक्ष्यराज यांनी विधी पूर्ण करण्यासाठी सिटी पॅलेसमध्ये प्रवेश करण्यास परवानगी न दिल्याने वाद निर्माण झाला.
अरविंद सिंग मेवार हे मेवार हाऊसचे 76 वे कस्टोडियन आणि मेवार चॅरिटेबल फाउंडेशनच्या महाराणा संस्थेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त होते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)