Mahadev Online Gaming App: बॉलिवूड हादरलं! संजय दत्त, मलायका अरोरा, सुनिल शेट्टी, कपील शर्मा यांच्याह अनेक सेलिब्रेटी ईडीच्या रडारवर, पाहा यादी

ज्यामुळे अवघे बॉलिवूड हादरले असून अनेक मोठमोठ्या कलाकारांची नावे या प्रकरणाशी जोडली जात आहेत.

Kapil Sharma, Sanjay Dutt, Malaika Arora, Sunil Shetty | | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

महादेव ऑनलाईन गेमिंग अॅप (Mahadev Online Gaming App) प्रकरणातील गुंतागुंत आता अधिकच वाढते आहे. ज्यामुळे अवघे बॉलिवूड हादरले असून अनेक मोठमोठ्या कलाकारांची नावे या प्रकरणाशी जोडली जात आहेत. यामध्ये सुनील शेट्टी (Suniel Shetty) , संजय दत्त (Sanjay Dutt), मलायका अरोरा, कपील शर्मा, यांच्यासह बॉलिवूडमधील नवे, जुने अशा जवळपास 34 कलाकारांची नावे पुढे आली आहेत. ज्यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचे सांगितले जात आहे. UAE मध्ये 18 सप्टेंबरला एक सौरभ चंद्राकर याच्या वाढदिवस निमित्त सेलिब्रेश आणि सक्सेस पार्टी झाली होती. हे सर्व कलाकार त्यात सहभागी होते, असे सांगण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर या पार्टीत एक युट्यूब एन्फुएन्सर सुद्धा सहभागी झाला होता, अशी माहिती आहे.

दावा केला जात आहे की, महादेव ऑनलाईन गेमिंग अॅप प्रकरणा सौरभ चंद्राकर हा प्रमुख आरोपी आहे. त्याने केवळ लग्नासाठी 200 कोटी रुपये तर बर्थडे आणि सक्सेस पार्टीसाठी तब्बल 60 कोटी रुपये खर्च केले. ईडीच्या तपासात या गोष्टी पुढे आल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

महादेव गेमिंग अॅपशी संबंधीत कलाकार

रफ्तार, 2) दीप्ती साधवानी, 3) सुनील शेट्टी, 4) सोनू सूद, 5) संजय दत्त, 6) हार्डी संधू, 7), सुनील ग्रोव्हर, 8) सोनाक्षी सिन्हा, 9) रश्मिका मानधना, 10) सारा अली खान, 11) गुरु रंधावा, 12) सुखविंदर सिंग, 13) टायगर श्रॉफ, 14) कपिल शर्मा, 15) नुसरत बरुचा, 16) डीजे चेतस, 17) मलायका अरोरा, 18) नोरा फतेही, 19) अमित त्रिवेदी, 20) मौनी रॉय, 21) आफताब शिवदासानी, 22) सोफी चौधरी, 23) डेझी शाह, 24) उर्वशी रौतेला, 25) नर्गिस फाखरी, 26) नेहा शर्मा, 27) इशिता राज, 28) शमिता शेट्टी, 29) प्रीती झांगियानी, 30) स्नेहा उल्लाल, 31) सोनाली सहगल, 32) इशिता दत्ता, 33) एलनाझ, 34) ज्योर्जिओ अॅड्रियानी

वरीलपैकी अनेक कलाकारांवर महादेव अॅपची जाहीरात आणि प्रमोशन केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाशी संबंदित अनेक कलाकारांना मोठी रक्कम देण्यात आल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. त्यातूनच हे सर्व कलाकार सौरभ चंद्राकर याच्या लग्नाला हजेरी लावताना दिसले. विशेष म्हणजे या हजेरीसाठी या कलाकारांना मोठ्या प्रमाणावर पैसे मिळाल्याचा दावा असून. या कलाकारांनी त्या बदल्यात पार्टीत सहभागी होणे आणि परफॉर्म करण्याचे काम केले. केवळ परफॉर्मर कलाकारच नव्हे तर अनेक सेलिब्रेटीसुद्धा या प्रकरणामुळे ईडीच्या रडारवर आले आहेत.