Mahadev Betting App Case: मुंबई पोलिसांकडून Dabur Group Chairman Mohit V Burman, Director Gaurav V Burman यांच्याही नावाचा FIR मध्ये समावेश!

अभिनेता साहिल खान व्यतिरिक्त, महादेव अॅपचा कथितपणे वापर किंवा प्रचार करणाऱ्या बॉलीवूड व्यक्ती गेल्या काही आठवड्यांपासून तपासयंत्रणांच्या रडार वर आहेत.

Mumbai Police Logo | (Photo Credits: File Image)

राजकारणी आणि सिनेतारकांनंतर आता उद्योगपतींची नावं देखील महादेव बेटिंग अ‍ॅप मध्ये समोर आली आहेत. डाबर ग्रुप चेअरमॅन मोहित व्ही बर्मन (Dabur Group Chairman Mohit V Burman) आणि डिरेक्टर गौरव व्ही बर्मन (Director Gaurav V Burman ) यांची नावं रडार वर आली आहेत. मुंबई पोलिसांच्या सध्या ते रडार वर आहेत. डाबर ग्रुप आयुर्वेदाशी संबंधित काही औषधं, च्यवनप्राश बनवतात. सध्या एफआयआर मध्ये त्यांच्या नावाचा समावेश आहे. मुंबई पोलिसांनी 7 नोव्हेंबरला एफआयआर दाखल केला असून 31 जणांच्या नावाचा त्यामध्ये समावेश आहे. यात बॉलिवूड अभिनेता साहिल खान देखील असल्याचं समोर आलं आहे.

डाबर ग्रुप कडून अद्याप या घडामोडीवर प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. या प्रकरणी पहिली तक्रार समाज सेवक प्रकाश बंकर यांनी माटुंगा पोलिसात दिली होती. त्यांनी लाखो लोकांची फसवणूक झाल्याचं म्हटलं आहे. 15,000 कोटींचा बेटिंग अ‍ॅपचा हा घोटाळा आहे. माटुंगा पोलिसांनी आयपीसीच्या विविध कलमांसह गॅमलिंग अ‍ॅक्ट, आयटी अ‍ॅक्ट अंतर्गतही कारवाई केली होती.

सध्या महादेव अ‍ॅप प्रकरणी ईडी कडून देखील चौकशी सुरू आहे. यामध्ये अनेक राजकीय व्यक्ती, प्रकाशझोकात असलेल्या व्यक्ती आणि कॉरपरेट्स मधील व्यक्तींचादेखील समावेश आहे. काही दिवसांपूर्वी ईडी च्या याचिकेवरून केंद्राने पावलं उचलताना सुमारे 22 अवैध बेटिंग साईट्स बंद केल्या आहेत. Mahadev Betting App Case: महादेव बेटिंग अॅप प्रकरणी राजकीय सल्लागाराला देण्यात आली 5 कोटींची लाच; ईडीच्या आरोपपत्रात खुलासा .

महादेव अ‍‍ॅपने छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना 500 कोटी रुपयांहून अधिक रक्कम दिल्याचा खळबळजनक दावा ईडीने केल्यानंतर हे प्रकरण अधिक चर्चेमध्ये आले. छत्तीसगडमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून आरोप होत असताना या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. साहिल खान व्यतिरिक्त, महादेव अॅपचा कथितपणे वापर किंवा प्रचार करणाऱ्या बॉलीवूड व्यक्ती गेल्या काही आठवड्यांपासून तपासयंत्रणांच्या रडार वर आहेत.