धक्कादायक! लग्नाला 8 वर्ष होऊनही मुलं झाले नाही म्हणून करवा चौथ च्या दिवशी पत्नीने पतीला जिवंत जाळले, मध्य प्रदेशातील हृदयद्रावक घटना
जेथे एका महिलेने करवा चौथच्या दिवशी आपल्या पतीवर रॉकेल टाकून जिवंत जाळले.
आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सौभाग्यवती स्त्रिया करवा चौथचा (Karva Chauth) निर्जळी उपवास करतात. मात्र याच दिवशी आपल्या पतीला जिवंत जाळल्याची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) एक महिलेने आपल्या पतीला करवा चौथच्या दिवशी जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाला 8 वर्ष होऊन मुलं झाले नाही या कारणामुळे आरोपी महिलेने आपल्या पतीला जिवंत जाळल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना मध्य प्रदेशच्या गंधवानी बोरडाबरा गावात घडली आहे. जेथे एका महिलेने करवा चौथच्या दिवशी आपल्या पतीवर रॉकेल टाकून जिवंत जाळले. त्यावेळी त्याला गंभीर अवस्थेत तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हेदेखील वाचा- Uttar Pradesh: कोरोना विषाणू संक्रमित महिलेची आत्महत्या; 'करवा चौथ' उपवासास विरोध केल्याच्या रागातून कृत्य
रिपोर्टनुसार, पत्नी हिरलबाई आणि पती तोप सिंह यांच्या लग्नाला 8 वर्षे होऊनही त्यांना मूल होत नव्हते. त्यामुळे या ब-याचदा खटके उडत होते. करवा चौथच्या दिवशी याच कारणावरून या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्याच रात्री 1 वाजताच्या दरम्यान पत्नी हिरलबाईने तोप सिंह यांच्यावर रॉकेल टाकून त्यांना जाळले. या घटनेनंतर तोप सिंह वेदनेने जोरजोरात ओरडायला लागले. त्यांचा आवाज ऐकून शेजारचे लोक त्यांच्या घरी आले. त्यांना आगीत झपटताना पाहून त्या लोकांनी ती आग विझवली आणि त्यांना रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
या घटनेने या परिसरात खळबळ उडाली असून हिरलबाईविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.