भोपाळ येथे रहिवासी भागात वाघाची धाव, स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण
खासकरुन वाघ हे शहरी भागात येत असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.
मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) येथे गेल्या काही दिवसांपासून वन्य प्राण्यांच्या हालचाली दिसून येत आहेत. खासकरुन वाघ हे शहरी भागात येत असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. याच परिस्थित पुन्हा एकदा रहिवाशी भागात वाघाने धाव घेतल्याचे सीसीटिव्ही फुटेज समोर आले आहेत.
भोपाळ येथे वाघ रात्रीच्या वेळेस रहिवाशी भागात फिरत असल्याचे सीसीटिव्ही फुजेटचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये वाघ हा स्थानिक रस्त्यावर फिरताना दिसून आला. त्यानंतर हळूहळू जवळच एका घराजवळ असलेल्या एका पार्क शेजारी जाताना दिसला. त्यानंतर घराजवळच उभ्या असलेल्या कार जवळ जाऊन पोहचतो. तसेच कारजवळील झाडाजवळ काही हालचाली केल्यानंतर आलेल्या मार्गाने परत जाताना दिसून येत आहे. ही घटना आज पहाटे 4 वाजताची असल्याचे सांगितले जात आहे.
वाघाच्या वावरावमुळे स्थानिकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच प्रशासनाने अलर्ट जाहीर केले असून कोणतीही जीवतहानी होऊ नये म्हणून स्थानिकांना घराबाहेर काम असल्यास जावे असे सांगण्यात आले आहे. तर काही दिवसांपूर्वीच गुजरात येथे मध्य प्रदेशातून आलेला वाघ दिसला होता.