Madhya Pradesh: माणुसकीला काळीमा! चोरीच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण; पिकअप वाहनाला बांधून रस्त्यावरून फरपटत नेले

येथे एका भील (आदिवासी) माणसाला चोरीच्या संशयावरून जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली, त्यानंतर त्याला पिकअप वाहनाच्या मागे बांधून रस्त्यावरून ओढत नेले

Mob Lynching (Photo Credits: IANS| Representational Image)

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) नीमच (Neemuch) जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथे एका भील (आदिवासी) माणसाला चोरीच्या संशयावरून जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली, त्यानंतर त्याला पिकअप वाहनाच्या मागे बांधून रस्त्यावरून ओढत नेले. इतके करूनही या लोकांचे समाधान झाले नाही, त्यामुळे नंतर त्यांनी या व्यक्तीला लाथांनी मारहाण केली. या घटनेची पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे पीडितेचा मृत्यू झाला. नीमच जिल्ह्यातील सिंगोली पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे.

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. तपासात असे आढळून आले की जमावाने संशयाच्या आधारावर पीडितेवर अत्याचार केले. बांदा गावात राहणाऱ्या कन्हैया नावाच्या पीडितेला जबर मारहाण करण्यात आली आणि पिकअप वाहनाला बांधून ओढण्यात आले. जखमी अवस्थेत त्याला लाथांनीही मारहाण करण्यात आली.

पीडितेला मारहाण करणाऱ्या लोकांनी स्वतःच 100 डायल करून पोलिसांना याची माहिती दिली. लोकांनी सांगितले की त्यांनी चोराला पकडले आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पीडितेला नीमच जिल्हा रुग्णालयात नेले, जिथे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात आरोपींनी स्वतः घटनेचा व्हिडिओ बनवला. नीमचचे एसपी सूरज वर्मा यांनी तातडीने आरोपींवर कारवाई केली आहे. एएसपी म्हणाले की, आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यासह इतर कलमेही लावण्यात आली आहेत. या प्रकरणात आरोपी महेंद्र गुर्जरची पत्नी बांदा परिसरातील सरपंच असल्याचे सांगितले जाते. एएसपीने सांगितले की, घटनेत वापरलेले पिकअप जप्त करण्यात आले आहे. (हेही वाचा: Man Stitches Wife's Genitals: पत्नीचे गुप्तांग धाग्यांनी शिवले, विकृत पतीचे संशयातून कृत्य)

आता या प्रकरणामुळे मध्य प्रदेशमध्ये राजकीय गोंधळ मजला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना लक्ष्य करत राज्याचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ट्वीट करत, ‘राज्यात नक्की काय चालले आहे..?’ असा सवाल उपस्थित केला आहे.