Maan Ki Baat: 'मन की बात' मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत 'या' मुद्द्यांवर केले भाष्य
Maan Ki Baat: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात' च्या 69 व्या एपिसोडमधून नागरिकांना संबोधले आहे. नरेंद्र मोदी यांच्या संबोधनात सुरुवातीलाच परिवारा संबंधित भाष्य केले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, कोरोनाच्या काळाने एकत्र रहायला शिकवले आहे. तसेच कोरोनाच्या दरम्यान काही बदल सुद्धा झाल्याचे दिसून आले. त्यामुळे आता परिवाराचे महत्व समजून आले आहे. मोदी यांनी लॉकडाऊन मधील एका आठवीबद्दल ही सांगितले. मोदी यांनी कथा ऐकवण्याच्या कले संदर्भातील मुद्द्यावर भाष्य करत असे ही सांगितले की, कथांचा इतिहास हा तेवढाच जुना आहे जेवढी मानवी सभ्यता. या व्यतिरिक्त मोदी यांनी हितोपदेश आणि पंचतंत्र कथांचा सुद्धा उल्लेख केला. त्यामधून विविके आणि बुद्धिमत्तेचा संदेश दिला जात असल्याचे म्हटले आहे.
मोदी यांनी मन की बात मध्ये पुढे बंगळुरु स्टोरी टेलिंग ग्रुपला एक कथा ऐकवण्यास सांगितले. त्यांनी राजा कृष्णदेव राय यांची कथा सांगितली त्यात तेनालीराम यांचा उल्लेख केल्याचे दिसून आला. त्याचसोबत आपल्या देशाला मोठी लोककलेची परंपरा लाभली असल्याचे ही मोदी यांनी म्हटले आहे.भारतातील 'किस्सागोईची परंपरा' आणि तमिळनाडु मधील 'विल्लू पाट' याबद्दल अधिक माहिती दिली. (PM Modi Interacts with Fitness Influencers: फिट इंडिया मोहिमेच्या वर्षपूर्ती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिलिंद सोमण याच्याशी साधला संवाद; पहा फिटनेसबद्दल काय म्हणाला आयर्न मॅन)
कोरोना व्हायरसच्या काळात नागरिकांनी मास्क घालावे असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
मोदी यांनी सर्जिकल स्ट्राइक बद्दल भाष्य करत असे म्हटले आहे की, आमच्या सैनिकांचे धैर्य, शौर्य आणि पराक्रम जगाने पाहिला आहे. आमच्या शूर सैनिकांचे एकच लक्ष होते की, आपल्या मातृभूमीचा गौरव आणि सन्मान काहीही झाले तरी तो कायम ठेवणायचा आहे.
शेतकऱ्यांना फक्त फळे, भाज्या विक्री करण्याची मोकळी नसून ते अन्य गोष्टी जसे भात, गहू, राई, उस यांची सुद्धा लागवड करत आहेत. 3-4 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात फळे, भाज्या एपीएमसीच्या कक्षेतून बाहेर ठेवण्यात आले होते. पण आता हे बदलले असल्याचे ही मोदी यांनी मन की बात मध्ये म्हटले आहे.
यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी 30 ऑगस्ट रोजी मन की बात मधून देशातील नागरिकांना संबोधित केले होते. त्यावेळी मोदी यांनी आत्मनिर्भर भारत या मुद्द्यावर जोर दिला होता. तसेच कोरोना व्हायरसच्या काळात लोकांनी परिस्थितीचे भान ठेवत सण साजरे केले त्याचा सुद्धा त्यांनी उल्लेख केला होता. या व्यतिरिक्त देशातील खेळणी उत्पादन, शिक्षण या मुद्द्यांवर ही भाष्य केले होते.