Ludo Game Affair: मुलायम सिंह यादव याने लुडो खेळात पटवली पाकिस्तानी मुलगी; विवाह करुन संसार थाटला; पोलिसांच्या एन्ट्रीने खेळ बिघडला
समाज, जात, धर्म, देश आणि प्रांत यापैकी कोणतेच कुंपण प्रेम नावाच्या संकल्पनेला बंधन घालू शकत नाही. प्रेमााला सीमा नसते हे पुन्हा एकदा ठळकपणे पुढे आले आहे. कहाणी आहे एका प्रेमी युगुलाची. ज्यातील एक राहतो भारतात आणि दुसरा पाकिस्तानात (Pakistan).
समाज, जात, धर्म, देश आणि प्रांत यापैकी कोणतेच कुंपण प्रेम नावाच्या संकल्पनेला बंधन घालू शकत नाही. प्रेमााला सीमा नसते हे पुन्हा एकदा ठळकपणे पुढे आले आहे. कहाणी आहे एका प्रेमी युगुलाची. ज्यातील एक राहतो भारतात आणि दुसरा पाकिस्तानात (Pakistan). होय, ऑनलाईन लुडो गेम्स (Gaming App Ludo) खेळताना पाकिस्तानातील एक मुलगी आणि उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील एक मुलगा एकमेकांच्या प्रेमात (Ludo Game Affair) पडले. प्रकरण इतक्यावरच थांबले नाही. तर, त्याला भेटण्यासाठी भारत -पाकिस्तान सीमा भेदून ही मुलगी चक्क भारतात आली.
त्याला भेटण्यासठी ती (पाकिस्तानी मुलगी) भारतात आली खरी. पण, त्यानेही (उत्तर प्रदेशमधील मुलगा) हिंमत दाखवली. त्याने तीला आपला जीवनसाथी बनवण्याचा निर्णय घेतला. दोघांनी लग्न केले आणि बंगळुरूमध्ये एकत्र राहू लागले. पण आता दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक करून भारतात प्रवेश करून येथे वास्तव्य केल्याप्रकरणी पोलिसांनी तरुणीला अटक केली आहे. मुलीसोबतच या प्रकरणात तिच्यासोबत आलेल्या मुलालाही अटक करण्यात आली आहे. (हेही वाचा, Foreigner Wife-Desi Husband: नाद केला अंगाशी आला; फॉरेनची बायको मिळविण्याच्या नादात 5.78 लाख रुपयांना चुना, विवाहोत्सुक तरुणाला फटका)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 वर्षीय मुलायम सिंह यादव हा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. तो बंगळुरू येथील एचएसआर लेआउट या खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. मुलायम आपला बराच वेळ गेमिंग अॅप लुडो खेळण्यात घालवायचा. याच गेमच्या माध्यमातून तो पाकिस्तानातील हैदराबाद येथे राहणाऱ्या 19 वर्षीय इक्रा जीवनी या तरुणीच्या संपर्कात आला. दोघेही प्रेमात पडले आणि त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा विचार केला.
मुलायम याच्या सांगण्यावरून 19 वर्षीय पाकिस्तानी तरुणीने सप्टेंबर 2022 मध्ये काठमांडू, नेपाळमार्गे भारतात प्रवेश केला. मुलगी आणि मुलायम दोघेही बंगळुरूच्या बेलंदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लेबर क्वार्टरमध्ये राहू लागले. मात्र, त्याचे हे गुपित फार काळ जगापासून लपून राहू शकले नाही. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी कारवाई करत दोघांना अटक केली.
पोलिसांनी मुलीला परदेशी विभागीय नोंदणी कार्यालयाच्या ताब्यात दिले आहे. याप्रकरणी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करत तिला अटक करण्यात आली आहे. तर बनावट पद्धतीने कागदपत्रे बेकायदेशीर पद्धतीने शहरात राहिल्याप्रकरणी पोलिसांनी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)