मैत्रिणीसोबतची भेट रोमांचक करण्यासाठी इंजेक्शनद्वारे Drug Overdose; 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू

सांगितले जात आहे की, एका तरुणाने आपल्या मैत्रिणीसोबतची भेट अविस्मरणीय करण्यासाठी केवळ थ्रील म्हणून तिला ड्रग्जचे इंजेक्शन दिले. शरीरात ड्रग्जचा ओव्हरडोस (Drug Overdose) झाल्याने तिचा कथीतपणे मृत्यू झाला.

Lucknow Police | (Photo credit: archived, edited, representative image)

भेटीचा आनंद अधिक रोमांचक करण्याच्या नादात मैत्रिणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुढे येत आहे. सांगितले जात आहे की, एका तरुणाने आपल्या मैत्रिणीसोबतची भेट अविस्मरणीय करण्यासाठी केवळ थ्रील म्हणून तिला ड्रग्जचे इंजेक्शन दिले. शरीरात ड्रग्जचा ओव्हरडोस (Drug Overdose) झाल्याने तिचा कथीतपणे मृत्यू झाला. लखनऊ (Lucknow) येथील तिवारीगंज परिसरात घराच्या गच्चीवर आरोपीने पीडितेला ड्रग्ज दिले त्यानंतर ही घटना घडली, असे पोलिसांनी सांगितले. पीडिता बंगळुरुहून नुकतीच परतली होती. दरम्यान, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पीडिता खासगी नोकरीत

पीडिता बंगळुरु येथे खासगी नोकरी करत होती. 3 एप्रिल रोजी ती काही दिवसांसाठी लखनऊला आली होती. येथील मुक्काम संपल्यावर 7 एप्रिल रोजी ती बंगळुरुला परतत होती. दरम्यान, बंगळुरुला जाण्यासाठी ट्रेन घेण्यासाठी ती महानगरातील तिच्या घरातून बाहेर पडली. दरम्यान, तिच्यासोबत ही घटना घडली. विवेक मौर्य (वय-28) असे आरोपीचे नाव आहे. तो बाराबंकी येथील रहिवासी आहे. त्याची पीडितेसोबत ओळख होती आणि तो लखनऊ येथेच राहात होता. (हेही वाचा, Aditya Singh Rajput Dies: स्प्लिट्सविला 9 फेम अभिनेता 'आदित्य सिंग राजपूत'चे निधन; बाथरूममध्ये आढळला मृतदेह, ड्रग ओव्हरडोजचा संशय)

ईसीजी तपासणीमध्ये तरुणीच्या मृत्यूची पुष्टी

सहाय्यक पोलिस आयुक्त (विभूती खांड) अनिंद्य विक्रम सिंह यांनी सांगितले की पोलिसांनी सुरुवातीला आयपीसी कलम 302 (हत्या) अंतर्गत प्रथम माहिती अहवाल (FIR) दाखल केला. नंतर तो आयपीसी कलम 304 मध्ये रूपांतरित करण्यात आला असे सांगितले. पोलिसांच्या अहवालानुसार, ड्रग्ज ओव्हरडोसनंतर पीडितेची तब्येत झपाट्याने बिघडली. ते पाहून आरोपीने तातडीने UP112 डायल करून मदत घेण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार आरोग्य विभागाने तत्काळ मदतीचा हात देत पीडितेला राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल केल. मात्र ईसीजी तपासणीनंतर तिला मृत घोषित करण्यात आले. धक्कादायक म्हणजे आरोपीही या वेळी प्रचंड नशेत होता. त्याला स्वत:चेही भान राहिले नव्हते. (हेही वाचा, Lucknow Shocker : लखनऊमध्ये मुलींच्या दोन गटात तुंबळ हाणामारी; केस ओढत, काठीने जोरदार मारहाण (Watch Video))

शवविच्छेदन अहवालाची प्रतिक्षा

दरम्यान, पीडिच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, पीडितेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालामध्ये तिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकेल. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये आरोपीने गुन्हा कबूल केला आहे. केवळ अधिक रोमांच शोधण्याच्या प्रयत्नात आपण पीडितेला अतीप्रमाणात ड्रग्ज दिले. हे ड्रग्ज आपण स्वत:ही टोचून घेतले आणि पीडितेलाही इंजेक्शनद्वारे दिले, असे आरोपीने सांगितले.

पोलिसांनी पुढे सांगितले की, पीडिता पूर्वी लखनऊच्या न्यू हैदराबाद भागात आरोपीच्या घरात तिच्या कुटुंबियांसोबत राहात होती. विवेक याला अमली पदार्थांचे व्यसन होते, त्याने पीडितेला हे पदार्थ सेवन करण्यास प्रवृत्त केले होते.पीडितेच्या मृत्यूची माहिती मिळताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यात त्याला यश आले नाही. इंदिरा कालव्याजवळ पोलिसांनी त्याला पकडले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif