Lord Buddha Idol Of Panduvanshi Period: घर बांधकामादरम्यान सापडली 'पांडुवंशी' कालीन गौतम बुद्ध मूर्ती; वाचा सविस्तर

काळाच्या उदरात गुडूप झालेल्या विविध आणि इतक्याच ऐतिहासिक गोष्टी अनेकदा खोदकामात आढळून येतात. छत्तिसगड (Chhattisgarh ) राज्यातील रायपूर-बिलासपूर (Raipur-Bilaspur Road) रस्त्यावरील सोंद्रा (Sondra Village) गावात एका घराच्या बांधकामासाठी सुरु असलेल्या खोदकामादरम्यान अशाच काहीशा गोष्टी आढळून आल्या आहेत.

Lord Buddha Idol Of Panduvanshi Period | (Photo Credit - ANI/Twitter)

काळाच्या उदरात गुडूप झालेल्या विविध आणि इतक्याच ऐतिहासिक गोष्टी अनेकदा खोदकामात आढळून येतात. छत्तिसगड (Chhattisgarh ) राज्यातील रायपूर-बिलासपूर (Raipur-Bilaspur Road) रस्त्यावरील सोंद्रा (Sondra Village) गावात एका घराच्या बांधकामासाठी सुरु असलेल्या खोदकामादरम्यान अशाच काहीशा गोष्टी आढळून आल्या आहेत. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार या गावात 'पांडुवंशी' (Panduvanshi Period) काळातील भगवान गौतम बुद्ध मूर्ती (Lord Buddha Idol) आढळली आहे. या मूर्तीसोबतच इतरही काही पुराततत्वीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या अशा मूर्ती सापडल्या आहेत. सोंद्रा गावातली दलिंदर बनचोर यांच्या घराचे बांधकाम सुरु आहे. बांधकामासाठी करण्यात येत असलेल्या खोदकामादरम्यान या मूर्ती सापडल्या आहेत.

घराच्या बांधकामादरम्यान काही ऐतिहासिक मूर्ती आढळून अल्याची माहिती समजताच पुराततत्व विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

Lord Buddha Idol Of Panduvanshi Period | (Photo Credit - ANI/Twitter)

ज्या सोंद्रा गावात बौद्ध मूर्ती आढळल्या ते गाव रायपूर-बिलासपूर रस्त्यापासून सुमारे 16 किलोमीटर आणि रायपूरमधील सांक्रा क्षेत्रापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे.  या गावात घराच्या बांधकामासाठी खांब रोवण्यासाठी पाया खोदण्याचे काम सुरु होते. खोल पाया खोदताना या मूर्ती या ठिकाणी आढळून आल्या. (हेही वाचा, Buddha Purnima 2022 Date: गौतम बुद्धांच्या जयंतीची तारीख, तिथी आणि बुद्ध पौर्णिमेचे महत्त्व जाणून घ्या)

Lord Buddha Idol Of Panduvanshi Period | (Photo Credit - ANI/Twitter)

खोदकामात सापडलेल्या सर्व मूर्ती दगडी आहेत. त्यांच्या कपाळावर तिलक चिन्हही दिसत आहे. यातील बुद्धांची एक मूर्ती ध्यानस्त अवस्थेत आहे. पुराततत्व विभागाने सर्व मूर्ती ताब्यात घेतल्या आहेत. या मूर्ती त्रिस्तरीय तंत्राने विकसीत करण्यात आल्या आहेत.अशाच प्रकारच्या भगवान बुद्धाच्या मूर्ती छत्तीसगडमधील सिरपूर आणि राजीम तसेच बिहारच्या बोधगयामध्ये उपलब्ध आहेत," असेही पूराततत्व विभागाने म्हटले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनास्थळी पाहणी करत असताना परिसरातील इतरही विविध स्वरूपातील मूर्तींशी संबंधित माहिती गोळा करण्यात आली. या ठिकाणाहून सापडलेल्या पुरातन वास्तू पांडुवंशी काळातील (इसवी सन 6वे ते 9वे शतक) असल्याचे दिसते, असेही अधिकारी म्हणाले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now