Lok Sabha Elections 2024 Schedule: लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर, आदर्श आचारसंहिता जारी

केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) पूर्वनियोजीत वेळेनुसार आज (16 मार्च) दुपारी 3 वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. या घोषणेसोबतच देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

Chief Election Commissioner Rajiv Kumar |

लोकसभा निवडणूक 2024 संदर्भात निवडणूक (Lok Sabha Elections 2024 Schedule) कार्यक्रम जाहीर झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) पूर्वनियोजीत वेळेनुसार आज (16 मार्च) दुपारी 3 वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. या घोषणेसोबतच देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. मतदान प्रक्रिया अधिक सक्षमपणे पार पडण्यासाठी निवडणूक आयोगाने विशेष काळजीही घेतल्याचे या वेळी सांगितले. निवडणूक प्रक्रियेदरम्यान होणाऱ्या अपप्रचार, भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीला आळा घालण्याचाही आमचा प्रयत्न असल्याचे आयोगाने या वेळी म्हटले.

12 राज्यांमध्ये महिला मतदारांची संख्या अधिक

निवडणूक आयोगाने या वेळी सांगितले की, लोकसभा निवडणूक जाहीर करण्यापूर्वी देशभरामध्ये मतदारांच्या याद्या तयार करण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली. आम्ही सर्व याद्या, नियम राजकीय पक्ष आणि तज्ज्ञांनाही दाखवले. जेणेकरुन सर्वांना नव्या बदलांची, नियमांची माहिती व्हावी. सर्व आकडेवारी तपासता पुढे आलेली माहिती अशी की, देशभरामध्ये 47 हजार पुरुष मतदार, 48 लाख मतदार ट्रान्सजेंडर, 21 कोटींहून अधिक तरुण मतदार, 12 राज्यांमध्ये महिला मतदारांची संख्या अधिक आहे. मतदान करण्यासाठी मतदार जेव्हा मतदान केंद्रावर येतील तेव्हा तिथे स्वच्छतागृह, व्हील चेअर, पाणी, स्वच्छता अशा सर्व आवश्यक बाबी उपलब्ध असतील. देशभरामध्ये अशा प्रकारची व्यवस्था पहिल्यांदाच केली जात आहे. (हेही वाचा, Lok Sabha Election Dates: लोकसभा निवडणूक कार्यक्रम आज होणार जाहीर; जाणून घ्या ECI कधी घेणार पत्रकार परिषद)

वृद्ध मतदाराला घरुन मतदान करण्याची सोय

जर एखादा मदतार 85 वर्षांपेक्षा अधिक वयाचा असेल तर तर त्यासाठी त्याला घरी राहूनही मतदान करण्याची मुभा देण्यात आली आहे. जर त्याला मतदान केंद्रावर यावे वाटले तर तशीही सोय असेल पण त्याला स्वत:च्या घरुन जर मतदान करायचे असेल तर ती सोयही उपलब्ध असणार आहे, असेही भारतीय निवडणूक आयोग द्वारा सांगण्यात आले.

व्हिडिओ

दरम्यान, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून रोजी संपत असून त्यापूर्वी नवीन सभागृहाची स्थापना करावी लागेल. त्यासोबतच आंध्र प्रदेश, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि ओडिशा विधानसभांचा कार्यकाळही जूनमध्ये संपणार आहे. त्यामुळे या राज्यांमध्येही लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका घेतल्या जातील, असे निवडणूक आयोगाने सांगितले.



संबंधित बातम्या