Lok Sabha Elections 2019 Phase 7:102 वर्षीय श्याम शरण नेगी ने बजावला मतदानाचा हक्क,नवरदेवही विवाहापूर्वी पोहचला मतदान केंद्रावर
प्रियंका गांधी, नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गजांचे राजकीय भवितव्य मतदान पेटीमध्ये बंद होणार आहे.
देशभरात आज 7 व्या टप्प्यातील मतदानासाठी भारतामध्ये 59 जागांवर मतदान सुरू आहे. प्रियंका गांधी, नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गजांचे राजकीय भवितव्य मतदान पेटीमध्ये बंद होणार आहे. आज मतदानाचा हक्क बजावण्याचा उत्साह 102 वर्षीय (Shyam Saran Negi) यांच्यासह नवतरूणांमध्ये दिसून आला आहे. आज कल्पा या हिमाचल प्रदेशात 102 वर्षीय श्याम सरण नेगी यांनी मतदान केले. तर तमिळनाडूमध्ये 103 वर्षीय महिलेनेही मतदानाचा हक्क बजावला.
मनालीमध्ये एका नवरदेवाने चक्क लग्नाच्या पेहरावातच कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. यावेळेस डोक्यावर सेहरा, गळ्यात फुलांचा, नोटांचा हार घालून पारंपारिक वेषभूषेमध्ये तो आला होता.
सामान्य नागरिकांप्रमाणेच लोकसभा स्पिकर सुमित्रा महाजन, रवी शंकर प्रसाद यांनी मतदानाचा हक्क बजावला. लोकसभा निवडणूकीसाठी मतमोजणी 23 मे रोजी पार पडणार आहे. आज संध्याकाळी एक्झिट पोल जाहीर होणार आहेत.