मतदानापूर्वी EVM मशीनचे सील उघडल्याने निवडणूक अधिकाऱ्यावर कारवाई

मतदान सुरु होण्यापूर्वी छत्तीसगढ (Chhattisgarh) येथे एका निवडणूक अधिकाऱ्याने ईव्हीएम (EVM) मशीनचे सील उघडल्याने कारवाई करण्यात आली आहे.

EVM Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

लोकसभा निवडणूकीसाठी (Lok Sabha Elections) आज (19 मे) शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. तत्पूर्वी मतदान सुरु होण्यापूर्वी छत्तीसगढ (Chhattisgarh) येथे एका निवडणूक अधिकाऱ्याने ईव्हीएम (EVM) मशीनचे सील उघडल्याने कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर येथील मतदान केंद्रावरील सर्व अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली.

बिलासापुर येथील भगड मतदान केंद्रावर शनिवारी रात्री नेमून दिलेल्या अधिकाऱ्यांनी मतदान होण्यापूर्वी ईव्हीएम मशीन उघडून त्याची चाचणी करण्यात सुरुवात केली. यामुळे अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा समोर आल्याने निवडणूक आयोगाकडून या प्रकाराबद्दल गंभीर दखल घेतली आहे.(Lok Sabha Elections 2019 Phase 7: 102 वर्षीय श्याम शरण नेगी ने बजावला मतदानाचा हक्क,नवरदेवही विवाहापूर्वी पोहचला मतदान केंद्रावर)

यापूर्वी आग्रा येथील सुद्धा एका मतदान केंद्रावर अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे मतदान रद्द करण्यात आले होते. त्यामुळे आता सुद्धा निवडणूक आयोगाने या प्रकारासाठी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी असे आदेश देण्यात आले आहे.