लोकसभा निवडणुकीच्या 2024 साठी सातव्या आणि अंतिम टप्प्याचे मतदान आज (शनिवार, 1 जून) पार पडत आहे. ज्याची मतमोजणी (Lok Sabha Election 2024 Counting) 4 जून रोजी पार पडणार आहे. दरम्यान, सकाळी 7 वाजता सुरु झालेले मतदान सायंकाळी 6 वाजता संपेल. त्यानंतर सायंकाळी 6.30 वाजता विविध माध्यमसंस्था आणि स्वतंत्र संस्थांनी घेतलेल्या जनमताचा कौल म्हणजेच एक्झिट पोल्स निकाल (Lok Sabha Election 2024 Exit Polls Results) जाहीर होतील. अर्थात जनमत चाचण्या म्हणजे काही निवडणुकीचा निकाल नसतो. मात्र, जनतेच्या मनात काय याबाबतचा काहीसा अंदाज येण्यास या चाचण्यामुळे मदत होते. या चाचण्यांचे निकाल आपण कधी, कुठे आणि कसे पाहाल? घ्या जाणून.
लोकसभा निवडणूक 2024 च्या अंतिम म्हणजेच शेवटच्या टप्प्यात आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 57 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. मतदान सकाळी 7 वाजता सुरू होऊन संध्याकाळी 6 वाजता संपेल. हे 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीतील सर्व 543 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदानाची समाप्ती दर्शवते. (हेही वाचा, Bihar Lok Sabha Election 2024: बिहार मध्ये कुटुंबाने आईच्या अंत्यविधी आधी दिलं मतदानाला प्राधान्य)
मतदानाच्या टप्प्यांचा आढावा
- पहिला टप्पा: 19एप्रिल
- दुसरा टप्पा: 26 एप्रिल
- तिसरा टप्पा: 7 मे
- चौथा टप्पा: 13 मे
- पाचवा टप्पा: 20 मे
- सहावा टप्पा: 25 मे
- सातवा टप्पा: 1 जून
निवडणूक निकाल आणि एक्झिट पोल
- मतमोजणी तारीख : मंगळवार, 4 जून
- भारतीय निवडणूक आयोग (ECI) 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर करेल.
- एक्झिट पोल माहिती
रिलीजची तारीख आणि वेळ:
टीव्ही चॅनेल आणि वेबसाइट्स 1 जून रोजी संध्याकाळी 6.30 नंतर एक्झिट पोल डेटा प्रसारित करतील.
- एक्झिट पोल्सवर ECI ची बंदी
निवडणूक आयोगाने 19 एप्रिल रोजी सकाळी 7 ते 1 जून रोजी संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत एक्झिट पोलचे आचरण, प्रकाशन किंवा प्रचार करण्यास बंदी घातली होती.
- एक्झिट पोलचे निकाल कोठे पहावे
- लाइव्ह स्ट्रीम: विवध वृत्तवाहिण्यांवर आपण एक्झिट पोल्सचे थेट प्रक्षेपण पाहू शकता
- ऑनलाइन अपडेट:
- YouTube आणि ऑनलाईन पोर्टल्स, वेबसाईट यांद्वारेही आपणास एक्झिट पोल्स पाहता येऊ शकतात. (हेही वाचा, Lok Sabha Elections 2024: सलग आठ वेळा मतदान करणं तरुणाला भोवलं, व्हिडिओ व्हायरल होताच ECI कडून कारवाई (Watch Video)
दरम्यान, लोकसभा निवडणुकीसोबतच देशामध्ये काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही पार पडल्या आहेत. या राज्यांतील विधानसभा निवडणुकांसाठी लोकसभेसोबतच झालेल्या मतदानाची मतमोजणीसुद्धा चार जून रोजीच पार पडणार आहे. देशभरातील जनतेच्या नजरा या निवडणूक निकालाकडे लागल्या आहेत. निकालाबाबतची उत्कंटा कायम असताना जनमताचा कानोसा एक्झिट पोल्सच्या माध्यमातून लोकांना घेता येऊ शकतो.
महत्त्वाची टीप: एक्झिट पोल ऐतिहासिकदृष्ट्या काही वेळा चुकीचे ठरले आहेत. त्यामुळे एक्झिट पोल्स अंदाजादरम्यान येणाऱ्या बातम्या, आकडेवारी आणि जनमताकल जाणून घेताना सावधगिरीने त्याचा अर्थ लावला पाहिजे.