Lok Sabha Election 2019: निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना जारी, 11 एप्रिल रोजी होणार मतदान
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना सोमवारी जारी करण्यात आली आहे.
Lok Sabha Election 2019: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना सोमवारी जारी करण्यात आली आहे. त्यानुसार देशातील 20 राज्यांमधील 91 मतदार संघासाठी 11 एप्रिलला मतदान पार पडणार आहे.
येत्या निवडणुकीत काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षाकडून भाजपला हरवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. परंतु भाजप हा केंद्रात आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पहिल्या टप्प्याच्या अधिसूचनेवर सही केल्याने ती काल जारी करण्यात आली आहे. तसेच कालपासून उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून 25 मार्च ही अखेरची तारीख उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी देण्यात आली आहे.(हेही वाचा-Lok Sabha Election 2019: मतदार यादी नाव नोंदणी करण्यासाठी शेवटचे 4 दिवस बाकी; पहा कशी ऑनलाईन नावनोंदणी)
पहिल्या टप्प्यातील मतदान हे आंध्र प्रदेश, आसाम, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, बिहार, जम्मू-काश्मिर, मणिपूर, महाराष्ट्र, मिझोराम, मेघालय, नागालँड, ओडिशा, सिक्किम, तेलंगणा, त्रिपूरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार व लक्षद्वीप येथे पार पडणार आहे.
तर एमआयएम (MIM) पक्षाचे अध्यक्ष असुद्दीन ओवेसी यांनी हैदराबाद येथून उमेदवारी दाखल केली आहे. तसेच हैदराबाद मध्ये दुर्बल, वंचित गट आहे. त्यामुळे या लोकांचे कार्य असेच पुढे सुरु ठेवण्याचे आश्वासन ओवेसी यांनी सोमवारी दिले आहे.