LIC कर्मचार्यांसाठी खूषखबर; 16% पगारवाढ, 5 दिवसांचा आठवडा ते 13,500 रूपयांपर्यंत Additional Allowance मिळणार
आता एलआयची संपत्ती 31,96,214.81 कोटी आहे.
LIC च्या सुमारे 1.14 लाख कर्मचार्यांसाठी 2020-21 हे आर्थिक नवं वर्ष मोठी आनंदायक बातमी घेऊन सुरू झालं आहे. एलआयसी कर्मचार्यांना 16% पगारवाढ जाहीर झाली आहे अशी युनियन लीडरची माहिती असल्याचं वृत्त देण्यात आले आहे. Business Standard च्या बातमीनुसार काल सरकारकडून एलआयसी कर्मचार्यांच्या पगारात वाढ झाल्याचं सांगण्यात आलं आहे. ही पगारवाढ 1 ऑगस्ट 2017 पासून लागू असेल. All India Insurance Employees Association चे जनरल सेक्रेटरी श्रीकांत मिश्रा यांनी IANS वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार,'सध्या सुरू असलेल्या बिकट काळात ही पगारवाढीची बातमी मिळणं दिलासादायक बाब आहे. कर्मचार्या प्रति महिना 25% पगारवाढ अपेक्षित होती.'
दरम्यान पगारवाढीसोबतच सार्या कॅडर मधील कर्मचार्यांना 1500 ते 13500 हा स्पेशल अलाऊंस जाहीर करण्यात आला आहे. तो डीए मध्ये मोजला जाणार आहे. पण अन्य म्हणजेच हाऊस रेंट अलाऊंस, सिटी कॉम्पेन्सेंटरी अलाऊंस, प्रिव्हिलेज लिव्ह एन्कॅशमेंट, ग्रॅज्युटी, सुपर अॅन्युएशन इन्कम यामध्ये मोजले जाणार नाही. यासोबतच आता एलआयसी कर्मचारी आठवड्याचे 5 दिवस काम करणार आहेत. (नक्की वाचा: 7th Pay Commission: केंद्रीय सरकारी कर्मचारी, निवृत्तीवेतन धारकांसाठी खूषखबर; मोदी सरकारकडून DA, DR benefitsचे संकेत, पगारात 'इतकी' घसघशीत होऊ शकते वाढ).
एलआयसी कर्मचार्यांसाठीच्या महत्त्वाच्या घोषणा
- एलआयसी कर्मचार्यांना 16% पगारवाढ
- 1500 ते 13500 हा स्पेशल अलाऊंस प्रति महिन्यासाठी जाहीर
- डीए 6352 पॉईंट्सवर
- पाच दिवसांचा कामाचा आठवडा
मीडीया रिपोर्ट्सनुसार, एलआयसी आता यावर्षी देशातील सर्वात मोठा आयपीओ घेऊन येण्याच्या तयारीमध्ये आहे. केंद्र सरकार एलआयसीच्या आयपीओ मधून 1 लाख कोटी रूपये जमा करण्याच्या विचारामध्ये आहे. तसेच त्यांच्या 10% वाटा विकण्याची शक्यता आहे.
सध्या 29 कोटी पॉलिसींसोबत जीवन वीमा कंपनी चा पेड अप कॅपिटल 100 कोटी रूपये आहे. एलआयसी ची सुरूवात 1956 साली 5 कोटी रूपयांसोबत झाली होती. आता एलआयची संपत्ती 31,96,214.81 कोटी आहे.