Bandipur Tiger Reserve: बांदीपूर व्याघ्र प्रकल्पात वेगवेगळ्या रंगाचे डोळे असलेला बिबट्या दिसला

ज्यामध्ये एक बिबट्या झाडावर बसलेला दिसत आहे. त्या फोटोचे वैशिष्ट्य म्हणजे बिबट्याचे डोळे. जे दोन वेगवेगळ्या रंगाचे आपल्याचे फोटोंमधून दिसत आहेत.

Photo Credit- X

Bandipur Tiger Reserve : बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाची अतिशय सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये एक बिबट्या झाडावर बसलेला दिसत आहे. त्या फोटोचे वैशिष्ट्य म्हणजे बिबट्याचे डोळे. जे दोन वेगवेगळ्या रंगाचे आपल्याचे फोटोंमधून दिसत आहेत, कर्नाटकातील बांदीपूर व्याघ्र प्रकल्पातील (Bandipur Tiger Reserve)एक दुर्मिळ फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. एका वन्यजीव फोटोग्राफरने आपल्या कॅमेऱ्यात झाडावर बसलेल्या बिबट्याचे सुंदर फओटो टिपले आहे. फोटो नीट पाहिल्यास बिबट्याचे डोळे वेगवेगळ्या रंगाचे असल्याचे दिसले. ज्या स्थितीत डोळ्यांचा सफेद भाग बहुरंगी असतो त्याला हेटरोक्रोमिया म्हणतात.

होटरोक्रोमिया या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भारतातील बिबट्यांमध्ये ही घटना प्रथमच नोंदवण्यात आली आहे. बिबट्याच्या या फोटोवर अनेकांनी प्रतिक्रीया नोंदवल्या आहेत. हे फोटो ध्रुव पाटील यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडल @dhruvpatil_photography वरून पोस्ट केले, ज्याला आत्तापर्यंत ६ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

युजर्स बिबट्याच्या या फोटोवर जोरदार कमेंट करत आहेत. एका वापरकर्त्याने 'दुर्मिळ फोटो' असे लिहिले आहे. आणखी एका युजरने 'डोळ्यांचे वेगवेगळे रंग आश्चर्य' असल्याचे लिहिले आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये बिबट्याच्या एका डोळ्याचा रंग हिरवा आहे तर दुसरा डोळा तपकिरी आहे. वन्यजीव छायाचित्रकार ध्रुवने इंस्टाग्रामवर हे छायाचित्र शेअर करताना लिहिले की, बिबट्याचा एक डोळा पाचूचा आणि एक डोळा सोन्याचा आहे.

पोस्ट पहा

 

View this post on Instagram

 

A post shared by Dhruv Patil (@dhruvpatil_photography)

त्यांनी पुढे लिहिले की मेलेनिस्टिक (ब्लॅक) बिबटे आधी काबिनीमध्ये आणि आता बांदीपूरमध्ये हेटेरोक्रोमिक बिबटे पाहणे खरोखरच अविश्वसनीय आहे! बिबट्याची तीन छायाचित्रे पोस्ट करताना छायाचित्रकार ध्रुव पाटील यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, हा एक अत्यंत दुर्मिळ जन्मजात रोग आहे, ज्याला हेटेरोक्रोमिया इरिडिस म्हणतात. बिबट्याचा हा प्रकार भारतात प्रथमच दिसला आहे.

अशा दुर्मिळ प्राण्यांमध्ये अशी दुर्मिळ वैशिष्ट्ये पाहणे आणि त्यांचे दस्तऐवजीकरण करणे खरोखरच आश्चर्यकारक आहे. फोटो Nikon Z9 कॅमेरा आणि Z400mm f4.5 लेन्सने घेण्यात आला आहे.