Gargi Phule join NCP: निळू फुले यांच्या कन्या अभिनेत्री गार्गी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

गार्गी फुले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात प्रवेश केला आहे.

Gargi Phule | | Irchived, edited, symbolic images)

मराठी चित्रपटांतून गावाकडचा इरसाल पुढारी रंगवणाऱ्या आणि तितक्याच ताकतीने खलनायकी भूमिका रंगवणारे दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्या कन्या गार्गी फुले (Gargi Phule ) यांनी राजकीय कारकीर्दीस सुरुवात केली (Gargi Phule join NCP) आहे. गार्गी फुले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात प्रवेश केला आहे. विधानसभेतील पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.

गार्गी फुले या 1998 पासून नाटक आणि चित्रपट क्षेत्राशी संबंधित आहेत. खास करुन प्रायोगिक नाट्य चळवळीशी त्यांचा अधिक संभंध आहे. भारतीय नाट्यक्षेत्रातील मोठे नाव सत्यदेव दुबे यांच्याकडेही त्यांनी काही काळ काम केले आहे. खरे तर त्या त्यांच्या विद्यार्थीनी राहिल्या आहेत. गार्गी यांनी B. A., M. A.in Women Liberation या विषयात पदवी घेतली आहे. त्यांनी अनेक नाटकांमध्ये आपल्या अभीनयाची छाप सोडली आहे. समन्वय या नाट्यसंस्थेसह त्या विविध कामांमध्ये सक्रीय असतात. (हेही वाचा, Ajit Pawar Video: अजित पवार यांनी हॉटेल मालकाचे निमंत्रण स्वीकारले, पण त्याला शॉवरखाली उभा केलं (पाहा व्हिडिओ))

पाठिमागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी विशेष प्रयत्नशिल आहे. उल्लेखनीय म्हणजे मधल्या काही काळांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सिने आणि नाट्य क्षेत्रामध्ये विशेष लक्ष घातले आहे. त्यामुळे अनेक कलाकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif