Lal Krishna Advani अयोद्धेमध्ये राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला येणार - विश्व हिंदू परिषदेचा दावा

22 जानेवारीला दुपारी मृगशीर्ष नक्षत्राच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

LK Advani | Twitter

विश्व हिंदू परिषदेचे इंटरनॅशनल वर्किंग प्रेसिडंट, आलोक कुमार (Alok Kumar) यांनी दिलेल्या माहितीनुसार 22 जानेवारी दिवशी राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला (Ayodhya Ram Mandir Pran Prashtha)  ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी (LK Advani) देखील हजेरी लावणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते कृष्ण गोपाल आणि राम लाल यांच्यासोबत आलोक कुमार यांनी अडवाणींना राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचे आमंत्रण दिले आहे.

अयोद्धेच्या राम मंदिराच्या भेटी दरम्यान एल के अडवाणी यांच्यासाठी सार्‍या वैद्यकीय मदतीची सोय केली जाणार आहे. आडवाणी सध्या 96 वर्षांचे आहे. राम मंदिराच्या निर्माणासाठी आडवाणींनी आंदोलनाचे नेतृत्त्व देखील केले होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे त्यांच्या उपस्थितीबाबत संभ्रम होता. Inauguration of Ayodhya Ram Mandir: कॉंग्रेस कडून Mallikarjun Kharge, Sonia Gandhi, Adhir Ranjan Chowdhury अयोद्धा राम मंदिर उद्धाटनाला राहणार अनुपस्थित! 

दरम्यान 22 जानेवारीला दुपारी मृगशीर्ष नक्षत्राच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. या सोहळ्याला देशा-परदेशातील मान्यवरांना आमंत्रण देण्यात आले आहे. 16 जानेवारीपासून अयोद्धेच्या राम मंदिराबाबत पूजा विधिंना सुरूवात होणार आहे. वाराणसीचे पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित 22 जानेवारी रोजी राम लल्लाच्या उत्सवाचा मुख्य विधी पार पाडतील. 14 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान अयोध्येत अमृत महोत्सव साजरा केला जाणार आहे. प्रभू रामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्याचे हिंदू बांधवांसाठी मोठे आध्यात्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. Ayodhya Ram Mandir Aarti Passes: अयोद्धा राम मंदिरात ऑनलाईन, ऑफलाईन आरती पास देण्यास सुरूवात; इथे पहा दर्शन, आरतीच्या वेळा आणि पास कसा मिळवाल? 

 सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अयोद्धेमध्ये राम मंदिराचे काम सुरू झाले आणि आता पहिल्या टप्प्यामध्ये प्राणप्रतिष्ठा करून मंदिराचे लोकार्पण केले जात आहे. अजूनही मंदिराचे काम पूर्ण होण्यास दीड-दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे.