Lakhimpur Kheri Violence: लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणी दोघांना अटक, केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला समन्स

लाखीमपूर खीरी हिंसाचार (Lakhimpur Kheri Violence) प्रकरणी उत्तर प्रदेश पोलीसांनी दोघांना अटक केली आहे तर केंद्रीय मंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आशीष मिश्रा (Ashish Mishra) यास समन्स पाठवले आहे. अजय मिश्रा यांच्या घराबाहेर उत्तर प्रदेश पोलिसांनी समन्स बाबत नोटीसही चिकटवले आहे.

Lakhimpur Kheri Violence: लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणी दोघांना अटक, केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला समन्स
Lakhimpur Kheri Violence (Photo Credits: ANI)

लाखीमपूर खीरी हिंसाचार (Lakhimpur Kheri Violence) प्रकरणी उत्तर प्रदेश पोलीसांनी दोघांना अटक केली आहे तर केंद्रीय मंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आशीष मिश्रा (Ashish Mishra) यास समन्स पाठवले आहे. अजय मिश्रा यांच्या घराबाहेर उत्तर प्रदेश पोलिसांनी समन्स बाबत नोटीसही चिकटवले आहे. या नोटीसमध्ये म्हटले आहे की, 'लाखीमपूर हिंसाचारातील आरोपी आशीष मिश्रा हजर हो'. मंत्री अजय मिश्रा यांच्या घराबाहेर ही नोटीस लावण्यात आली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री आशीष मिश्रा यांच्या मुलाला उत्तर प्रदेश पोलिसांनी उद्या (8 ऑक्टोबर) सकाळी 10 वाजता चौकशीसाठी बोलावले आहे. लखीमपूर प्रकरणात ज्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे त्या दोघांपैकी एकाचे नाव लवकुश आणि दुसऱ्याचे आशीष पांडेय असल्याचे समजते.

पोलिसांनी दिलेल्या माहितुसार हे दोघेही त्याच वाहनात होते. ज्या वाहनाने शेतकरी आणि पत्रकारास धडक दिली. लखीमपूर खीरीच्या IG लक्ष्मी सिंह यांनी म्हटले आहे की, घटना घडल्यानंतर यांनी थांबण्याचा प्रयत्न केला नाही. या घटनेत सहा लोकांचा हात असल्याचे पुढे आले आहे. तिघांचा मृत्यू झाला आहे. इर तिघांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. (हेही वाचा, Lakhimpur Kheri Violence: नवजोत सिंह सिद्धू यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात)

लखीमपूर खीरी येथे झालेल्या हिंसाचाराच्या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला होता. यात चार शेतकऱ्यांचा समावेश आहे. जेव्हा एका काळ्या रंगाच्या SUV वीने आंदोलक शेतकऱ्यांना धडक दिली. त्यांना चीरडत ही SUV घटनास्थळावरुन निघून गेली. तेव्हा ही हिंसा घडली होती.

लखीमपुर खीरी हिंसाचार प्रकरणाचे देशभर पडसत उमटत आहेत. देशभरातील विविध पक्षाचे नेते लाखीमपूर खीरीच्या दिशेने रवाना होत आहेत. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) सरकारकडून या सर्वच नेत्यांना अडवले जात आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनाही लखीमूर खीरी येथे जाण्यापासून रोखले. त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्यासोबत असलेल्या काँग्रेस खासदार दीपेन्द्र हुड्डा यांनाही पोलिसांकडून धक्काबूक्की झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आज पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवजोत सिंह सिद्दू यांनाही लखीमपूर खीरी येथे जाण्यापासून रोखण्यात आले.

(The above story first appeared on LatestLY on Oct 07, 2021 11:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).